गोंदिया ०३ जुन (हिं. स.) : सडक अर्जुनी तालुका अंतर्गत येणाऱ्या ग्राम सौंदड येथे काल पतीने तर दोन दिवसापूर्वीच पत्नीने रेल्वेसमोर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या जोडप्याचा नुकताच जानेवारी महिन्यात प्रेम विवाह संपन्न झाला होता. मात्र, हा प्रेम विवाह औटघटकेचा ठरत अल्पशा कालावधीनंतर भंगला होता. यामुळे पत्नी डीकेश्वरी भुसारी ने गोंदिया चांदाफोर्ट रेल्वेसमोर आत्महत्या केली होती. त्या पाठोपाठ तिच्या पतीने सुध्दा रेल्वेपुढे उडी घेत आत्महत्या केली. यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. डूग्गीपार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिगंबर भुसारी असे मृताचे नाव आहे. त्याची पत्नी डीकेस्वरी हीने याच रेल्वे मार्गावर आत्महत्या केली होती. पत्नी नंतर आता पतीने आत्महत्या का केली याचा शोध पोलिस घेत आहेत. सदर अपघाताची माहिती रेल्वे विभागाचे कर्मचारी यांनी डूग्गीपार पोलिसांना दिली. सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात दिगंबर श्रावण भुसारी याचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे.
हिंदुस्थान समाचार