गोदरेज इंटिरिओची केएमआरसीएल सोबत भागीदारी
मुंबई, 3 जून (हिं.स.) गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी गोदरेज आणि बॉयसने घोषणा केली की, त्यांच्या घरगुती
मुंबई


मुंबई, 3 जून (हिं.स.) गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी गोदरेज आणि बॉयसने घोषणा केली की, त्यांच्या घरगुती आणि संस्थात्मक विभागातील एक व्यवसाय व भारतातील एक अग्रगण्य फर्निचर सोल्युशन्स ब्रॅंड, गोदरेज इंटेरिओने कोलकातामधील हावडा येथील भारतातील सर्वात खोल मेट्रो कॉरिडॉरमध्ये स्थित मेट्रो स्थानकांचे इंटेरियर डिझाईन बनवणे आणि त्याची अंमलबजावणीचे काम पूर्ण केले आहे. ही उपलब्धी निवासी आणि संस्थात्मक या दोन्ही क्षेत्रांमध्ये विस्तारीत आहे.

गोदरेज इंटेरिओने कोलकाता मेट्रो प्राधिकरणासोबत विशिष्ट बांधकाम उपक्रम हाती घेण्यासाठी भागीदारी केली, ज्यामध्ये नागरी व बांधकाम कामे, काचेची कामे, प्लंबिंग आणि रेज्ड अॅक्सेस फ्लोअर’ सिस्टम यांचा समावेश आहे. हे भूमिगत मेट्रो स्टेशन गोदरेज इंटेरिओचे अभियांत्रिकी कौशल्य आणि जटील तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक आणि आद्य पायाभूत सुविधा प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी समर्पण आणि उच्च गुणवत्तेचे परिणाम देण्यासाठी ब्रॅंडची वचनबद्धता दर्शवते. पायाभूत सुविधा क्षेत्रात संपूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत उपाय व सुविधा प्रदान करून गोदरेज इंटेरिओ आपली बाजारपेठ मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहे.

गोदरेज इंटेरिओचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख श्री. स्वप्नील नगरकर म्हणाले, “पायाभूत सुविधा क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचे महत्वपूर्ण चालक आहे. भारताला २०२५ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास आवश्यक आहे.१ मेक इन इंडिया मिशनच्या अनुषंगाने, गोदरेज इंटेरिओने सातत्याने राष्ट्र उभारणीमध्ये आघाडीची भूमिका बजावली आहे. हे मेट्रो स्टेशन या वर्षाच्या अखेरीस चालू होईल आणि सुमारे सात लाख प्रवाशांना जलद आणि सोयीस्कर वाहतूक प्रदान करेल. केएमआरसीएल (KMRCL) आणि मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन्ससोबत भागीदारी करून टर्नकी सोल्युशन्समध्ये आमच्या कौशल्याचा वापर करून एक अपवादात्मक प्रवासी अनुभव देण्याचे आमचे ध्येय आहे. संपूर्ण देशभरात एक मजबूत सार्वजनिक वाहतूक नेटवर्क स्थापन करण्याच्या भारताच्या दृष्टिकोनात आमचे प्रयत्न योगदान देतात. सध्या, आमच्या टर्नकी प्रोजेक्ट व्यवसायाचा आमच्या बी२बी (B2B) विभागातील उलाढालीत २२% वाटा आहे आणि आम्ही आर्थिक वर्ष २५ पर्यंत २०% चक्रवाढ वार्षिक वाढीची अपेक्षा करतो.”

गोदरेज इंटेरिओने आर्थिक वर्ष २३ ला संपलेल्या आर्थिक वर्षासाठी २७०० कोटी रुपयांची कमाई केली. त्यांच्या टर्नकी इन्फ्रास्ट्रक्चर सोल्युशन्स व्यवसायाने त्याच आर्थिक वर्षात रु. १०० कोटींपेक्षा जास्त महसूल मिळवला आहे. गोदरेज इंटेरिओ व्यवसाय, ज्याचा टर्नकी इन्फ्रास्ट्रक्चर सोल्युशन्स हा एक भाग आहे, कोची मेट्रो, मुंबई मेट्रो लाइन आणि अशा अनेक प्रकल्पांसाठी विविध मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन आणि सरकारी प्राधिकरणांसोबत काम करत आहे, ज्यामुळे त्यांनी आर्थिक वर्ष २३ मध्ये पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये रु. ३३५ कोटी रुपयांचा मोठया प्रमाणात महसूल मिळवला.

वास्तुविशारद, इंटिरिअर डिझाईनर आणि प्रकल्प व्यवस्थापकांच्या कुशल टीमसह गोदरेज इंटेरिओ सर्वोत्कृष्ट दर्जाच्या अंमलबजावणीसह अखंड अनुभव देण्यासाठी विविध मेट्रो कॉर्पोरेशनशी सहभागीदारी करीत आहे. त्यांच्या वैविध्यपूर्ण आणि व्यापक सेवांमध्ये ठेकेदारी, रचना, अंमलबजावणी, इंटिरिअर डिझाईन, एमईपी (MEP), सुरक्षा व पाळत तसेच एव्ही प्रणाली या सेवांचा अंतर्भाव आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande