सावधान ! गणरायासह हलाल उत्पादने तर आपल्या घरी येत नाहीयेत ना ?
प्रस्तावना : सध्या ‘हलाल जिहाद’ हे एक गंभीर आर्थिक संकट भारतियांवर ओढवले आहे. हलाल ही संकल्पना आता क
Ramesh Shinde


रमेश शिंदे


प्रस्तावना : सध्या ‘हलाल जिहाद’ हे एक गंभीर आर्थिक संकट भारतियांवर ओढवले आहे. हलाल ही संकल्पना आता केवळ मांसापुरती मर्यादित राहिली नाही, तर अनेक शाकाहारी पदार्थ, धान्य, खाद्यतेल, सुकामेवा, मिठाई, चॉकलेट, शीतपेये आदीही हलाल प्रमाणित करण्यात येत आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये पसरत असलेल्या अशा घातक हलाल षड्यंत्रापासून हिंदूंचे पवित्र सण-उत्सवही सुटू शकले नाहीत. गणेशोत्सवात श्री गणेशाच्या स्वागतासाठी, नैवेद्यासाठी हिंदू भाविक मिठाई, तसेच विविध पदार्थ बाजारातून खरेदी करत असतात; पण तोच नैवेद्य अशा पद्धतीने ‘हलाल’ प्रमाणित असेल तर... ? त्यामुळे एक सर्वसामान्य नागरिक म्हणून गणरायासह हलाल उत्पादने तर आपल्या घरी येत नाहीयेत ना ? एक भाविक म्हणून आपले पूजासाहित्य, श्री गणेशाचा प्रसाद, खाद्यपदार्थ ‘हलाल प्रमाणित नाहीत ना’, याची निश्चिती करा.

समांतर इस्लामी अर्थव्यवस्थेची निर्मिती ! : हलाल जिहादच्या माध्यमातून राष्ट्रविघातक शक्तींनी स्वतःची वेगळी अर्थव्यवस्था निर्माण केली आहे. त्या माध्यमातून भारताला इस्लामी राष्ट्र करण्याचे षड्यंत्र राबवले जात आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला समांतर अर्थव्यवस्था चालवून देशाला खिळखिळे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारत सरकारच्या ‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’ (FSSAI) आणि ‘एफ्.डी.ए.’ (FDA) यांसारख्या खाद्यपदार्थांचे प्रमाणीकरण करणार्या शासकीय संस्था अस्तित्त्वात असतांनाही ‘हलाल सर्टिफिकेशन’द्वारे समांतर इस्लामी अर्थव्यवस्था निर्माण केली जात आहे. पूर्वी मांसापुरती असणारी मूळ ‘हलाल’ची इस्लामी संकल्पना आज अन्नधान्य, मिठाई, सौंदर्यप्रसाधने, शाकाहारी पदार्थ, औषधे, पर्यटन, रुग्णालये, इमारती, उपाहारगृहे, संकेतस्थळे आदी प्रत्येक क्षेत्रांत लागू करण्यात आलेली आहे. आज ‘मॅकडोनल्ड्स’, ‘केएफ्सी’, ‘बर्गरकिंग’, ‘पिझ्झा हट’ यांसारखी आंतरराष्ट्रीय आस्थापने हिंदू, जैन, बौद्ध, शीख अशा गैर-मुस्लिम समाजाला सक्तीने ‘हलाल सर्टिफाइड’ पदार्थ विकत आहेत. 15 टक्के मुसलमानांसाठी 80 टक्के हिंदू समाजावर हलालची सक्ती केली जात आहे.

हलाल प्रमाणिकरणातून मिळालेल्या पैशांचा वापर आतंकवाद्यांना कायदेशीर साहाय्य देण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ‘हलाल अर्थव्यवस्था’ एक मोठे संकट बनले आहे. नुकतेच भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने ‘जमियत-उलेमाला’ या संघटनेला अधिकृतपणे ‘हलाल सर्टिफिकेशन’ची मान्यता देणारे नोटिफिकेशन जारी केले आहे. जर हे लागू झाले, तर आता चालू असलेली अघोषित हलाल सक्ती अधिकृत होईल. आज हलाल सर्टिफिकेटच्या पुढे जाऊन आता ‘इस्लामिक कॉईन’ काढण्यात आले आहे. ‘हलाल शेअर मार्केट’ चालू झाले आहे. हलाल प्रमाणपत्र हवे असेल, तर 2 मुसलमान मौलानांना त्या कंपन्यांमध्ये ‘हलाल इन्स्पेक्टर’ या नावाने वेतन देऊन कामाला ठेवावे लागणार आहे. भारतीय अर्थव्यवस्था टिकवून ठेवायची असेल, तर हलालसक्तीला विरोध करायला हवा.

गणेशोत्सव हलालमुक्त करण्यासाठी... : गणेशोत्सव हा एक मोठा उत्सव आहे. लोकमान्य टिळकांनी परकीय सत्तेच्या विरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. हा उद्देश साध्य करण्यासाठी गणेशोत्सव मंडळे देखावे, फ्लेक्स प्रदर्शन, व्याख्याने, हस्तपत्रके आदी माध्यमांतून ‘हलाल सर्टिफिकेशन’विषयी जनजागृती करू शकतात. या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘देशाच्या अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण : हलाल जिहाद ?’ हा ग्रंथही प्रकाशित करण्यात आला आहे. एक सर्वसामान्य भाविक म्हणूनही व्यक्तीगत स्तरावरही आपण जागृती करावी, तसेच देशाची अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी सतर्कतेने खरेदी करावी.

हलाल जिहाद हे आर्थिक स्तरावरील युद्ध : अर्थसंपन्न व्यक्तीच राज्यव्यवस्थेत प्रभावशाली मानली जाते, तसेच अर्थसंपन्नतेमुळेच अमेरिका, इंग्लंड आदी देश पुढारलेले म्हणवले जातात! म्हणूनच अर्थकारण महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत जगाचा विनाश करू पहाणार्या जिहाद्यांच्या हातात जर ही अर्थव्यवस्था गेली, तर...? यासाठी हलाल अर्थव्यवस्थेला विरोध करणे आवश्यक आहे. हलाल जिहाद हे आर्थिक स्तरावरील युद्धच आहे. त्यामुळे या ‘आर्थिक जिहाद’चा प्रतिकार करणे आवश्यक आहे. केवळ हलालमुक्त गणेशोत्सव नाही, तर हलालमुक्त भारत होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे, ही काळाची आवश्यकता आहे.

- रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती (Email : [email protected])

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande