आयएनएस निरीक्षक त्रिंकोमालीहून रवाना
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर (हिं.स.) : आयएनएस निरीक्षक या भारतीय नौदलाच्या डायव्हिंग सपोर्ट आणि पाणबुडी
INS Nirikshak


नवी दिल्ली, 22 सप्टेंबर (हिं.स.) : आयएनएस निरीक्षक या भारतीय नौदलाच्या डायव्हिंग सपोर्ट आणि पाणबुडी बचाव जहाजाने श्रीलंकेच्या नौदलासोबत एक आठवडा डायव्हिंग प्रशिक्षण सराव केल्यानंतर 21 सप्टेंबर 2023 रोजी त्रिंकोमालीहून प्रस्थान केले. दोन्ही नौदलाच्या डायव्हिंग चमूने व्यापक प्रमाणात बंदर तसेच सागरी क्षेत्रात डायव्हिंग मोहिमा हाती घेतल्या होत्या. याशिवाय, या जहाजाचे चालक दल आणि श्रीलंकेच्या नौदलाच्या कर्मचाऱ्यांमध्ये परस्पर हितसंबंधांच्या विविध पैलूंवर कर्मचार्यांच्या परस्पर प्रशिक्षणासह अनेक संवाद सत्र आयोजित केले गेले. जहाजाला भेट देणाऱ्या त्रिंकोमाली येथील कनिष्ठ कमांड अँड स्टाफ कॉलेजच्या अधिकाऱ्यांना जहाजाच्या सर्वोत्तम डायव्हिंग क्षमतेबद्दल माहिती देण्यात आली.

ईस्टर्न नेव्हल एरियाचे कमांडर रिअर ॲडमिरल पी एस डी सिल्वा यांनी जहाजाला भेट दिली आणि श्रीलंकन नौदलाच्या डायव्हर्सच्या प्रशिक्षणासाठी भारतीय नौदल करत असलेल्या मदतीचे कौतुक केले. दोन्ही नौदलांमधील सर्वोत्तम पद्धती आणि व्यावसायिक कौशल्याची देवाणघेवाण करण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला.

प्रशिक्षण उपक्रमांव्यतिरिक्त, त्रिंकोमाली येथील वंचित मुलांच्या शाळेत एक सामाजिक संपर्क कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारे स्वच्छता दिनानिमित्त डच बीचवर एक संयुक्त समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

एकता आणि परस्पर कल्याण प्रदर्शित करण्यासाठी श्रीलंकेच्या नौदलाच्या जवानांसोबत संयुक्त योग सत्र आणि मैत्रीपूर्ण बास्केटबॉल सामना आयोजित करण्यात आला होता.

हे जहाज पर्यटकांसाठी खुले होते.सुमारे 1500 हून अधिक पाहुण्यांनी जहाजाला भेट दिली.

या जहाजाच्या भेटीमुळे दोन्ही नौदलांमधील मजबूत संबंध आणखी दृढ झाले आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande