सातारा 23 सप्टेंबर, (हिं.स.) : येथील श्यामसुंदरी चॅरिटेबल अँड रिलीजियस सोसायटीच्या के.एस. डी. शानभाग विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत यश मिळवले आहे. आता या खेळाडूंची निवड विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झालेली आहे. रायफल शूटिंग स्पर्धा म्हसवड येथे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मेरी माता हायस्कूल, म्हसवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांचे गटात ओपन साईट रायफल प्रकारात रितेश गिरिधारी लाल जांगिड याने सिल्वर मेडल तर अथर्व प्रवीण कुमार जगताप याने ब्रांझ मेडल मिळवले. सतरा वर्षाखालील गटात ओपन साईट रायफल प्रकारात सर्वेश नितीन जोशी यांनी ब्रांझ मेडल तर, 19 वर्षाखालील मुलांच्या गटात ओपन साईट रायफल प्रकारात अनुराज सुभाष पाटील यांनी सिल्वर तर आर्यन संभाजी गर्गे यांनी ब्रांझ मेडल मिळवले आहे. सतरा वर्षाखालील मुलांच्या एयर पिस्टल प्रकारात स्वयम बिपिन गायकवाड यांनी सुवर्णपदक मिळवले आहे. आताही सर्व खेळाडू झोनल रायफल शूटिंग स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
या सर्व खेळाडूंना शाळेचे वतीने आशिष सपकाळ यांनी प्रशिक्षक व मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले.
या विशेष यशाबद्दल के. एस. डी शानभाग विद्यालय आणि जुनियर कॉलेजचे संस्थापक व ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रमेश शानभाग, विश्वस्त उषा शानभाग, संचालिका आचल घोरपडे, शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा गायकवाड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी तसेच पालक संघाचे प्रतिनिधी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या खेळाडूंना शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हिंदुस्थान समाचार