दहशतवादी तहव्वूर राणाच्या विरोधात आरोपपत्र दाखल
मुंबईतील 26/11च्या हल्ला प्रकरणी 405 पानी आरोपपत्र मुंबई, 25 सप्टेंबर (हिं.स.) : मुंबईत 26 नोव्हेंब
दहशतवादी तहव्वूर राणाच्या विरोधात आरोपपत्र दाखल


मुंबईतील 26/11च्या हल्ला प्रकरणी 405 पानी आरोपपत्र

मुंबई, 25 सप्टेंबर (हिं.स.) : मुंबईत 26 नोव्हेंबर 2011 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने जिहादी दहशतवादी तहव्वूर राणाच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलेय. राणा सध्या अमेरिकेच्या तरुंगात असून त्यांच्या विरोधात 405 पानांचे पाचवे आरोपपत्र दाखल करण्यात आलेय. यानंतर राणाच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

मुळचा पाकिस्तानी असलेल्या राणाने कॅनडाचे नागरिकत्व घेतले असून एका पत्रकाराच्या हत्येप्रकरणी तो सध्या अमेरिकेच्या जेलमध्ये आहे. तिथल्या कोर्टाने मे महिन्यात तहव्वूरचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास मंजुरी दिलीय. मुंबईतील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात तहव्वूरचा सहभाग असल्याचे आरोप आहेत.लश्कर-ए-तोयबाचा पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड हेडलीचाही कट रचण्यात समावेश होता. राणा आणि मिस्टर सेंडस हे शिकागो येथे एमिग्रेट लॉ सेंटर चालवत होते. राणाने डेव्हिड हेडलीच्या मदतीने मुंबईत एमिग्रेट लॉ सेंटरचे ऑफिस उघडले होते. त्या निमित्ताने डेव्हिड हेडली हल्ला करण्याच्या आधी मुंबईत आला.मुंबईत ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला करायचा आहे, त्या ठिकाणांचे त्याने फोटो काढले. ते फोटो घेऊन हेडली हा शिकागोला परतला होता. त्यानंतर त्याने मुंबईतील हे फोटो लश्कर-ए-तोयबाच्या कमांडर्सना दिले. अशी खळबळजनक साक्ष डेव्हिड हेडलीने मुंबईच्या न्यायालयात दिली होती. डेव्हिड हेडली हा मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याने त्याला शिकागोच्या न्यायालयाने 35 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

तहव्वूर राणा हा मूळचा पाकिस्तानी आहे. पाकिस्तानी सैन्यात असताना त्याने डॉक्टर म्हणून सेवा दिली आहे. पाकिस्तानमध्येच राणा आणि हेडली यांची ओळख झाली होती. राणा हा 1997 मध्ये कॅनडामध्ये स्थलांतरित झाले आणि जून 2001 मध्ये कॅनडाचे नागरिकत्व मिळवले. भारताने 10 जून 2020 रोजी तक्रार दाखल केली होती. तसेच तहव्वूर राणाला अटक करण्याची विनंतीही भारताने केली होती. त्यानुसार त्याला अमेरिकेत अटक करण्यात आली होती. त्यानंतर अमेरिकन प्रशासनाने राणाला भारतात पाठवण्यास पाठिंबा देत मान्यता दिली. भारत आणि अमेरिकेत दरम्यान प्रत्यार्पण करार आहे. त्या कराराअंतर्गत तहाव्वूर राण्याच्या प्रत्याप्रणाला मंजुरी मिळाली आहे. आता, आरोपपत्र दाखल झाल्याने त्याचे लवकरच भारतात प्रत्यार्पण होण्याची शक्यता आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande