पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कर्मचारी भरतीत गैरव्यवहार, रिपाई आठवले गटाचा आरोप!
अकोला, 25 सप्टेंबर (हिं.स.) डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कर्मचारी भरतीमध्ये घोटाळा, गैरव्यवहा
photo


photo


अकोला, 25 सप्टेंबर (हिं.स.) डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कर्मचारी भरतीमध्ये घोटाळा, गैरव्यवहार तसेच पात्र सेवाजेष्ठते नुसार काम करणाऱ्या मजूर कामगारांची फसवणुक करून त्यांच्यावर अन्याय केल्याचा आरोप रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया(ए) सोशल मीडिया व आयटी सेलचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष बुद्धभूषण डी. गोपणारायन यांनी केला आहे. आज अकोल्यातील विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये शा.नि.क्र. संकीर्ण १४१५/प्र.क्र.१२ / ६ चे दि. २४ /७/२०१५ या आदेशाला बगल देवून बेकायदेशिररित्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. तर रोजंदार जेष्ठ व पात्र कामगारांना डावलून फसवणुक केली असल्याचा आरोप करीत तसेच दिनांक १४/९/२००५ मध्ये सुध्दा बोगस नोकर भरतीसह इतर घोटाळे विद्यापीठाने केल्याबाबत महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे महासंचालक यांच्याकडे दिनांक १९/६/२०२३ रोजी निवेदन देवून संबंधीत प्रकरणामध्ये चौकशी करून मजूर कामगारांवर झालेल्या अन्यायावर तसेच बोगस नोकर भरतीमध्ये अनियमितता याची सखोल चौकशी करण्यात यावी. आणि संबंधीत दोषी अधिकान्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे व मजूर कामगारांना दि. १४/९/२००५ पासुन सेवाजेष्ठतेनुसार पात्र मजुरांना शासना तर्फे आर्थिक मदत देऊन न्याय देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. यावर सहसंचालक यांनी सदर प्रकरणाचे पृष्ठयार्थ लिखीत पुरावे देण्यास कळविले होते. त्याअनुषगाने ४६३ पानाचे शासकीय कागदपत्रे कृषी परिषदेस सादर केले. त्या अनुषंगाने सहसंचालक यांनी संबंधीत प्रकरणामध्ये चौकशी समिती गठीत केली. तसेच संबंधीत कर्मचारी भरती घोटाळयामध्ये बोगस नोकरी भरतीमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. अकोला रजि.नं. १४४ येथील तात्कालीन अध्यक्षांनी पतसंस्थेची उपविधी व नियमावाली धाब्यावर टांगून मनमानी कारभार केला आहे. सन २००५ व २०१५-१६ मध्ये झालेल्या बोगस नोकर भरतीमध्ये संबंधीत पतसंस्थेची उपविधीला छेद देवून नियमबाहय पध्दतीने कर्ज वाटपाची तक्रार सहकार आयुक्त व निबंधक पुणे यांच्याकडे करून संबंधीत प्रकरणामध्ये आयुक्त यांच्या तर्फे जिल्हा उपनिबंधक यांना पत्राद्वारे संबंधीत तक्रारीची चौकशी करून अहवाल सादर करण्यास पत्राद्वारे कळविले आहे. त्याअनुषंगाने जिल्हा उपनिबंधक यांनी दोन सदस्यीय चौकशी समिती गठीत करून पतसंस्थेमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

शासन निर्णय २४ जुलै २०१५व १६नोव्हेंबर २०१५ नुसार २५४. रोजनंदार मजूर यांना सेवेत सामावून घेतले असून उर्वरित १३७१ रोजंदारी मजूर यांना सेवा जेष्ठता नुसार विद्यापीठ सेवेत सामावून घेण्यासाठीचा प्रस्ताव ७जुलै २०१८ रोजी शासनास सादर करण्यात आला आहे.१४ऑगस्ट २००५ रोजी प्रसिद्ध जाहिरातीच्या अनुषंगाने झालेल्या भरती प्रक्रिया बाबत ३विभागीय चौकशी समित्या स्थापन केल्या होत्या. या समिती ने दिलेल्या अहवालानुसार दोषी आढळलेल्या ४ कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित केले होते असे पत्र सह संचालक प्रशासन कृषि परीषद पुणे यांनी सांगतांना या व्यतिरिक्त पुरावे असल्यास द्यावे असे कळवील्यानुसार २८ऑगस्ट २०२३ रोजी ४६३पानांचे पुरावे सादर करण्यात आले आहेत त्यामुळे डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पीडित रोजंदारी कामगारांना न्याय देण्यासाठी संबधीत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आणि पीडित कामगारांना त्यांचा आर्थिक मोबदला द्यावा अशी मागणीही करण्यात आली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande