झी मराठीच्या कलाकारांना मिळाली मुंबईचा राजाच्या महाआरतीची सुवर्णसंधी
मुंबई, 25 सप्टेंबर (हिं.स.) :मुंबईचा राजा अर्थात लालबागमधील गणेश गल्लीच्या राजाची भव्य महाआरती करण्
झी मराठीच्या कलाकार


मुंबई, 25 सप्टेंबर (हिं.स.) :मुंबईचा राजा अर्थात लालबागमधील गणेश गल्लीच्या राजाची भव्य महाआरती करण्याची सुवर्ण संधी आपल्या झी मराठीच्या कलाकारांना मिळाली. तो क्षण कलाकारांसाठी व गणेश भक्तांसाठी अविस्मरणीय होता. यात उत्साहाने सहभागी असलेले मालिकेतील कलाकार म्हणजे प्रेक्षकांच्या आवडत्या जोड्या आयुष संजीव व अनुष्का सरकटे (३६ गुणी जोडी), दीपा परब व आदित्य वैद्य (तू चाल पुढं) आणि तितिक्षा तावडे व अजिंक्य ननावरे (सातव्या मुलीची सातवी मुलगी). तिन्ही मालिकेच्या कलाकारांनी भक्तांसोबत बाप्पाची महाआरती करून मनोभावे आराधना केली व आपल्या मालिकेचा प्रवास असाच छान चालत राहवा व प्रेक्षकांना नेहमी मनोरंजन होत राहावे अशी प्रार्थना केली. कलाकारांनी गणेश भक्तांसोबत संवाद साधला व प्रेक्षकांची मने जिंकली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande