जळगाव, 1 ऑक्टोबर, (हिं.स.) पाणी भरण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय विवाहितेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जळगाव शहरातील श्याम नगर येथून समोर आला आहे. याप्रकरणी सोमवारी ३० सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील श्याम नगर परिसरातील एका भागात २१ वर्षीय विवाहिता ही आपल्या पतीसह राहते. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता संशयित आरोपी सुभाष चव्हाण रा.श्याम नगर, जळगाव यांच्या पत्नीच्या सांगण्यावरून विवाहिता पाणी भरण्यासाठी घरी आली होती. त्यावेळी संशयित आरोपी सुभाष चव्हाण याने विवाहितेला अंगावर ओढून तिच्यावर अत्याचार केला. त्यावेळी तिने आरडाओरड केली असता विवाहितेचे पती यांनी दरवाजा लोटून आत आले असता संशयित आरोपीने गळा दाबून ढकलून देत पसार झाला. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सोमवारी ३० सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सुभाष चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास दमोदरे हे करीत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर