दिवाळीनंतर भाजपचा प्रचार महासंग्राम, मोदी 8, शाह 20, गडकरी-फडणवीस सर्वाधिक
मुंबई ३० ऑक्टोबर (हिं.स.) : महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघांवर लक्ष ठेवून भाजपने व्यापक प्रचार मोहिमेचे नियोजन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात विभागनिहाय म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई-कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात एकूण 8
निलडणूक २


मुंबई ३० ऑक्टोबर (हिं.स.) : महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघांवर लक्ष ठेवून भाजपने व्यापक प्रचार मोहिमेचे नियोजन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात विभागनिहाय म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई-कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात एकूण 8 सभा घेण्याची योजना आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची २० सभा होणार आहे. तसेच भाजपच्या वतीने १०० पेक्षा अधिक सभा आयोजित करण्यात येणार आहेत. यात नितीन गडकरी ४०, देवेंद्र फडणवीस ५०, योगी आदित्यनाथ १५, चंद्रशेखर बावनकुळे ४० सभा घेणार आहेत . सर्वाधिक जबाबदारी ही फडणवीस, बावनकुळे यांच्यावर असणार आहे.

यामुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होत असल्याने महाराष्ट्राची निवडणूक यंदा अत्यंत रंगतदार ठरणार आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान होईल तर २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.

हिंदुस्थान समाचार / Shuddhodana Mangorao


 rajesh pande