अदानी समूहावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप
मुंबई, २१ नोव्हेंबर (हिं.स.) :अमेरिकेतील न्यूयॉर्क फेडरल कोर्टाने अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी, त्यांचा पुतण्या सागर अदानी आणि अन्य सहा जणांवर अब्जावधी डॉलर्सच्या फसवणुकीसह लाचखोरीचे गंभीर आरोप ठेवले आहेत. या प्रकरणात भारतातील सौर ऊर्जा प्रकल्प मि
गौतम अदानी


मुंबई, २१ नोव्हेंबर (हिं.स.) :अमेरिकेतील न्यूयॉर्क फेडरल कोर्टाने अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी, त्यांचा पुतण्या सागर अदानी आणि अन्य सहा जणांवर अब्जावधी डॉलर्सच्या फसवणुकीसह लाचखोरीचे गंभीर आरोप ठेवले आहेत. या प्रकरणात भारतातील सौर ऊर्जा प्रकल्प मिळवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना तब्बल २,११० कोटी रुपये (२५० दशलक्ष डॉलर्स) लाच दिल्याचा आरोप आहे.

सागर अदानी हे २०१५ मध्ये ब्राउन युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्र पदवी घेतल्यानंतर अदानी समूहात सामील झाले. त्यांनी समूहाचा ऊर्जा विभाग आणि विशेषतः अदानी ग्रीन एनर्जीचे सौर व पवन ऊर्जा पोर्टफोलिओ तयार करण्याची जबाबदारी पार पाडली आहे. २०३० पर्यंत जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा पार्क उभारण्याच्या उद्दिष्टावर सागर अदानी काम करत आहेत. फेडरल कोर्टातील तक्रारीनुसार, गौतम अदानी व सागर अदानी यांनी अन्य आरोपींसह भारतातील सरकारी अधिकाऱ्यांना सौर ऊर्जा प्रकल्पांचे कंत्राट मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाच दिली. यासोबतच गुंतवणूकदारांची दिशाभूल करत अब्जावधींचा निधी जमा केल्याचा आरोप आहे. यामध्ये अमेरिकेतील एमईसी अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली असून प्रकल्पासाठी लाच दिली गेली का, याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणामुळे अदानी समूहाच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. विशेषतः अदानी ग्रीन एनर्जीच्या सौर प्रकल्पांसाठी दिलेल्या लाचेचे आरोप भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठी धक्कादायक ठरले आहेत. अदानी समूहाने अद्याप यावर औपचारिक प्रतिक्रिया दिलेली नाही. या गंभीर आरोपांमुळे अदानी समूहाला मोठ्या आंतरराष्ट्रीय कायदेशीर आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / Shuddhodana Mangorao


 rajesh pande