भंडारा-गोंदियात सात पैकी सहा सीट महाविकास आघाडीने गमावल्या
भंडारा, 23 नोव्हेंबर (हिं.स.) - भंडारा-गोंदिया जिल्हा हा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचा गृह जिल्हा मानला जातो. अतीतटीच्या लढाईत नाना पटोले यांचा शेवटच्या क्षणी विजय झाला आहे. पण गड गेला सेनापती आला अशी अवस्था महाविकास आघाडीच्या या ठिकाणी झाली आहे. त्यामुळे नाना पटोले यांना स्वताच्या जिल्ह्यात स्वतः व्यतिरिक्त एकही सीट काढता आली नाही. त्यामुळे नाना पटोले प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा देणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Pravin Tandekar