गडचिरोलीत धर्मरावबाबा आत्राम, डॉ. मिलिंद नरोटे विजयी, कृष्णा गजबेंची हॅट्ट्रिक हुकली
गडचिरोली, 23 नोव्हेंबर (हिं.स.) राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच अहेरी विधानसभा क्षेत्रात वडील मुलगी आणि पुतण्या अशी अहेरीच्या राजघराण्यात लढत रंगली होती. त्यामध्ये राज्याचे कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार माजी
विजयी जल्लोष


कार्यकते जल्लोष


गडचिरोली, 23 नोव्हेंबर (हिं.स.)

राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच अहेरी विधानसभा क्षेत्रात वडील मुलगी आणि पुतण्या अशी अहेरीच्या राजघराण्यात लढत रंगली होती. त्यामध्ये राज्याचे कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार माजी पालकमंत्री अंबरीश राव आत्राम यांना 16857मताधिक्याने पराभूत करीत सलग दुसऱ्यांदा विजय साजरा केला.तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे मैदानात असलेल्या भाग्यश्री आत्राम ह्या तिसऱ्याक्रमांकावर राहिल्या.

पहिल्या फेरीपासूणच धर्मरावबाबानी आपले मताधिक्य कायम ठेवले होते शेवटच्या फेरीपर्यंत आपली विजयी आघाडी कायम ठेवून विजय संपादन केला. हा आपल्या विकासकामांचा व जनतेनी दिलेल्या विश्वासाचा विजय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विजयानंतर आलापल्ली व नागेपल्ली मध्ये विजयी रॅली फटाके फोडून नाचून माहायुतीच्या कार्यकत्यांनी जल्लोष साजरा केला.

गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली आणि अहेरी मतदारसंघात महायुतीला वर्चस्व कायम ठेवण्यात यश आले. तर आरमोरीत भाजपच्या वर्चस्वाला धक्का देत काँग्रेसने यश संपादन केले. मतमोजणीच्या सुरवातीला अत्यंत चुरशीचा ठरलेला सामना शेवटी एकतर्फी झाल्याने गडचिरोलीत भाजपचे डॉ. मिलिंद नरोटे अहेरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते धर्मरावबाबा आत्राम आणि आरमोरीत काँग्रेसचे रामदास मसराम विजयी झाले.

महायुतीमध्ये अहेरीत मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा सामना कन्या भाग्यश्री आत्राम (हलगेकर) व भाजपचे बंडखोर पुतणे माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याशी झाला. ही लढत राज्यात लक्षवेधी होती. मात्र, तेथे धर्मरावबाबा आत्राम यांनी 16857 मताधिक्क्याने विजय खेचूण आणत अहेरीवरील हुकूमत अबाधित ठेवण्यात यश मिळवले. दुसरीकडे गडचिरोलीत भाजप व काँग्रेसने नवे चेहरे मैदानात उतरवले होते. भाजपने विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांना नाकारुन डॉ. मिलिंद नरोटे या नव्या तरुण उमेदवाराला संधी दिली होती. डॉ. नरोटे यांनी १४ हजारांहून अधिक मतांनी काँग्रेसच्या मनोहर पोरेटी यांना पराभवाची धूळ चारुन विजय नोंदवला. तर आरमोरीत भाजपने कृष्णा गजबे यांना तिसऱ्यांदा संधी दिली. हॅटट्रिकच्या उंबरठ्यावरील गजबे यांचा सामना काँग्रेसच्या रामदास मसराम यांच्याशी झाला. नवख्या मसराम यांनी ५ हजार ७८२ इतक्या मतांनी पराभूत करुन गजबे यांच्या वर्चस्वाला जोरदार हादरा दिला.

--------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande