बेंगळुरू, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेटल (IIM) च्या सध्या सुरू असलेल्या 78 व्या वार्षिक तांत्रिक संमेलनाच्या (ATM) दुसऱ्या दिवशी, आज पोलाद आणि अवजड उद्योग मंत्री श्री. एच.डी. कुमारस्वामी यांच्या हस्ते प्रतिष्ठित नॅशनल मेटलर्जिस्ट अवॉर्ड्स (NMA) प्रदान करण्यात आले.
प्रमुख पुरस्कार विजेत्यांमध्ये, श्री. शशी शेखर मोहंती, एस्सार मिनमेट लिमिटेडचे सीईओ आणि एमडी, सेलचे माजी संचालक (तांत्रिक), यांना आयआयएमचे आणि जेएसडब्ल्यू ग्रुपचे अध्यक्ष श्री. सज्जन जिंदाल यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत श्री. एच.डी. कुमारस्वामी यांच्या हस्ते प्रतिष्ठित 'जीवनगौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले.
मेटलर्जी आणि संबंधित क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी नॅशनल मेटलर्जिस्ट अवॉर्ड्स दिले जातात. या क्षेत्रातील योगदानासाठी लाइफटाईम अचिव्हमेंट, नॅशनल मेटलर्जिस्ट, लोह आणि पोलादामधील R&D, पर्यावरण विज्ञान तसेच धातू विज्ञान श्रेणींमध्ये यंग मेटलर्जिस्ट असे विविध प्रतिष्ठित पुरस्कार दिले जातात.
श्री. सज्जन जिंदल, IIM चे अध्यक्ष आणि JSW समूहाचे अध्यक्ष, म्हणाले, “नावीन्य, संशोधन आणि तांत्रिक उत्कृष्टतेसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेटल (IIM) हे नेहमीच एक व्यासपीठ राहिले आहे. श्री. कुमारस्वामी जी यांची उपस्थिती आमच्या क्षेत्राला बळकट करण्यासाठी आणि 21व्या शतकात नेतृत्व करणारा एक लवचिक, जागतिक दर्जाचा पोलाद उद्योग उभारण्यासाठी सरकारची वचनबद्धता अधोरेखित करते.
“जागतिक स्पर्धेमध्ये पूर्णपणे उतारण्यापुरवती पोलाद आणि जड उत्पादनासारख्या गंभीर उद्योगांना समर्थन देणारी स्पर्धात्मक उत्पादन परिसंस्था तयार करण्याची गरज आहे यावर मी भर दिला आहे. हा दृष्टीकोन आपल्या धातू क्षेत्रामध्ये लवचिकता आणि शाश्वत वाढ सुनिश्चित करण्यात मदत करेल. आमच्या उद्योगासाठी हा एक परिवर्तनाचा क्षण आहे. नवीन कल्पनांना प्रेरणा देण्यासाठी, सहकार्य वाढवण्यासाठी आणि भारताला उज्ज्वल, शाश्वत भविष्याकडे नेण्यासाठी या संधीचा फायदा घेऊया,” ते पुढे म्हणाले.
20-22 नोव्हेंबर 2024 या कालावधीत बेंगळुरू येथील डॉ. बाबू राजेंद्र प्रसाद इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरच्या GKVK कॅम्पसमध्ये हा तीन दिवसीय मार्की इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले आणि त्यानंतर वेगवेगळे कार्यक्रम आणि परिसंवाद यांचे एक उत्कृष्ट सत्र सुरू झाले.
पुरस्कार समारंभाच्या व्यतिरिक्त, IIM-ATM 2024 च्या दुसऱ्या दिवशी IIM मेमोरियल लेक्चर्स तसेच तंत्रज्ञानाशी संबंधित शेकडो सत्रे होती, ज्यात एसएमई, मेटलर्जिस्ट आणि पोलाद शास्त्रज्ञांसोबतच 1,700 हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले. या चर्चांमध्ये धातूशास्त्र, भौतिक विज्ञान आणि शाश्वत उत्पादन तंत्रज्ञानातील नवनवीन प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
पोलाद मंत्रालयासोबतच विजयनगर, बंगलोर, डोलवी, सालेम आणि कोलकाता (IIM चे मुख्यालय) च्या IIM संस्थांच्या मदतीने JSW स्टीलने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात ज्ञानाच्या देवाणघेवाणीसोबतच नवकल्पनांचा शोध घेण्यासाठी आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांना एकत्र येण्याची संधी मिळते आहे. यामुळे धातू आणि साहित्य उद्योगाच्या भविष्याला निश्चितच आकार मिळेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर