रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला जनमताचा कौल मिळाला आहे. राज्यातील विधानसभेच्या 81 जागांपैकी इंडी आघाडीला 56 जागा मिळाल्या असून इंडिया आघाडीला 24 जागांवर समाधान मानावे लागले आहे. राज्यात बहुमतासाठी 42 जागा आवश्यक असून झामुमोच्या नेतृत्वात सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालाय.
इंडि आघाडीत मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या झामुमोला सर्वात जास्त 34 जागांवर विजय मिळाला असून, काँग्रेस 16, राष्ट्रीय जनता दल (राजद) 4, सीपीआयएमएल 2 जागेवर विजय झाले आहेत. एनडीएमध्ये भाजपला 21, जदयू 1, अजसयू पक्षाला 1 आणि लोजपाला 1 जागेवर विजय मिळाला आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री हेमंत सोरेन बरहेट मतदारसंघातून, त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन गांडेयमधून, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बाबूलाल मरांडी धनवाडमधून, भाजप नेते चंपई सोरेन सेराईकेला मतदारसंघातून विजयी झाले आहेत. भाजप नेत्या सीता सोरेन यांचा जामतारा मतदारसंघातून पराभव झाला असून काँग्रेसचे इरफान अन्सारी विजयी झाले आहेत. तर डुमरी मतदारसंघातून झामुमोच्या बेबी देवी यांना पराभवाचा सामना करावा लागला. तिथे झालोक्रांमोचे जयराम महातो विजयी झाले आहेत. इंडिय आघाडी हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वात झारखंडमध्ये निवडणूक लढली आहे. ते विद्यमान मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे पुन्हा राज्याचे नेतृत्व त्यांच्याकडेच जाणार आहे. तसेच त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांची लोकप्रियता प्रचंड वाढलेली दिसून आली. हेमंत सोरेन तुरुंगात गेल्यावर लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत कल्पना सोरेन यांनी जोरदार प्रचार केला. इंडि आघाडीच्या विजयानंतर हेमंत सोरेन बोलताना म्हणाले की, कल्पना सोरेन ‘वन मॅन आर्मी’ आहेत. त्यामुळे कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री बनवण्याची शक्यता वर्तवली जातेय.
-------------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी