जरांगे फॅक्टर फेल! भाजपसह महायुतीला महाराष्ट्रात अभूतपूर्व यश
मुंबई, २३ नोव्हेंबर (हिं.स.) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीने अपेक्षेपेक्षा भव्य यश मिळवत भाजपने ऐतिहासिक आघाडी घेतली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करणारे मनोज जरांगे हे निवडणुकीत प्रभाव टाकतील, अशी अपेक्षा होती. मात्र, हा फॅ
जरांगे पाचील


मुंबई, २३ नोव्हेंबर (हिं.स.) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीने अपेक्षेपेक्षा भव्य यश मिळवत भाजपने ऐतिहासिक आघाडी घेतली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करणारे मनोज जरांगे हे निवडणुकीत प्रभाव टाकतील, अशी अपेक्षा होती. मात्र, हा फॅक्टर निष्प्रभ ठरला.

जालन्यातून आंदोलन उभारलेल्या मनोज जरांगे यांनी मराठा समाजासाठी ओबीसी कोट्यात आरक्षणाची मागणी केली होती. त्यांच्या आंदोलनाने मराठा समाजात एकता आणली, मात्र त्याचवेळी ओबीसी समाजात असंतोष निर्माण झाला. ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवल्याने जातीय फूट निर्माण झाली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याचे आश्वासन देत ओबीसींचे हित जपण्याचा संतुलित दृष्टिकोन ठेवला. 'मुख्यमंत्री लाडकी बहीण'योजना आणि ओबीसी समाजाचे मत सुरक्षित राखणे महायुतीच्या विजयाचा कणा ठरले. मराठवाड्यातील जालना, बीड, परभणीसारख्या जिल्ह्यांत जरांगेंचा प्रभाव दिसेल, असे वाटले होते. मात्र, महायुती २५ हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. हे स्पष्ट होते की, जरांगे फॅक्टर या निवडणुकीत प्रभावी ठरला नाही. महायुतीने जातीय समीकरण नीट साधत मराठा व ओबीसी समाजाचे समर्थन मिळवले. त्यामुळे जरांगे फॅक्टर निष्प्रभ ठरला आणि महायुतीला यश मिळाले.

हिंदुस्थान समाचार / Shuddhodana Mangorao


 rajesh pande