थोरात, चव्हाण, टोपे, कडू, नवाब मलिकांचा पराभव
मुंबई, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : राज्य विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी लागलेल्या निवडणूक निकालात अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. यामध्ये यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या पासून अनेक माजी मंत्र्यांचा समावेश आहे.
पराभूतांमध्ये सर्वात धक्कादायक नाव काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांचे आहे. संगमनेरमध्ये शिवसेनेचे अमोल खताळ यांनी त्यांचा पराभव केला. थोरातांचा 10,500 हून अधिक मतांनीत्यांचा पराभव झाला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांचा समाजवादी पार्टीच्या अबु आझमी यांनी शिवाजी मानखुर्दे मतदारसंघात तब्बल 30 हजार मतांनी पराभव केला. तर कराड-दक्षिण मतदारसंघातून भाजपच्या अतुलबाबा भोसलेंनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला. तासगाव कवठेमहंकाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे रोहीत पाटील यांनी पराभव केला. त्यांचा 15 हजारहून अधिक मतांनी पराभवझाला. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरमधील औरंगाबाद पूर्वमध्ये बाजप नेते अतुल सावे यांनी एआयएमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांचा पराभव केला. जलील यांचा जळवपास 2 हजार मतांनी पराभव झाला.
पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये अत्यंत अटीतटीची लढत झाली. या लढतीत राष्ट्रवादी (अजित पवार)चे दत्तात्रय भरणे यांचा विजय झाला आहे. त्यांनी माजी मंत्री, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. 19 हजार 410 पाटील यांचा पराभव झाला.
घनसावंगीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे बळिराम उधाम यांनी राष्ट्रवादा काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री राजेश टोपे यांचा पराभव केला. अचलपूरमध्ये भाजपचे प्रवीण तायडे यांनी प्रहार जनशक्ती पार्टीचे बच्चूकडू यांचा पराभव केला आहे. कडू 12131 मतांनी पराभूत झाले आहेत.
कराड उत्तरमध्ये भाजपचे मनोज घोरपडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील यांचा पराभव केला आहे. पाटील यांचा 43691 मतांनी पराभव झाला. दिग्रसमध्ये शिवसेना शिंदे गटाचे संजय राठोड यांनी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला आहे. ठाकरे यांचा 28775 मतांनी पराभव झाला आहे. कर्जत जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी भजप नेते राम शिंदे यांचा पराभव केला. शिंदे यांचा 1243 मतांनी पराभव झाला. रिसोडमध्ये काँग्रेसचे अमित झनके यांनी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या भावना गवळी यांचा पराभव केला. त्या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. या निवडणुकीत गवळी यांचा 16116 मतांनी पराभव झाला आहे.
तिवसा येथे भाजपचे राजेश वानखेडे यांनी काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचा पराभव केला. ठाकरू 7617 मतांनी पराभूत झाल्या. अक्कल कुवा येथे शिवसेना शिंदे गटाचे अमश्या पाडवी यांनी काँग्रेसचे के सी पाडवी यांचा पराभव केला. पाडवी 2904 मतांनी पराभूत झाले. ठाण्यात भाजपचे संजय केळकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा पराभव केला. विचारे 58253 मतांनी पराभव केला.माहिम मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांचा शिवसेना ठाकरे गटाचे नेते महेश सावंत यांनी पराभव केला. सदा सरवणकर यांचा 1316 मतांनी पराभव झाली. कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे समरजीत सिंह घाटगे यांचा पराभव केला आहे. घाटगे यांचा 11581 मतांनी पराभव झाला.
------------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी