महायुतीचं यश; प्रेम आणि विश्वासाचा विजय : एकनाथ शिंदे
मुंबई, २३ नोव्हेंबर (हिं.स.): राज्यात महायुतीला मिळालेलं यश हे लाडक्या बहिणींचं प्रेम आणि अडीच वर्षांच्या कामाची पोचपावती आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. शिंदे यांनी लोकांचे आभार मानत पुढच्या कार्यकाळात जबाबदारी अधि
एकनाथ शिंदे


मुंबई, २३ नोव्हेंबर (हिं.स.):

राज्यात महायुतीला मिळालेलं यश हे लाडक्या बहिणींचं प्रेम आणि अडीच वर्षांच्या कामाची पोचपावती आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. शिंदे यांनी लोकांचे आभार मानत पुढच्या कार्यकाळात जबाबदारी अधिक वाढल्याचं सांगितलं.

लोकांचा विश्वास आणि महायुतीचं यश

महायुतीला मिळालेला जनमताचा कल समाजातील सर्व स्तरांतील लोकांनी दिलेल्या पाठिंब्याचं प्रतीक आहे. शिंदे म्हणाले की, लाडक्या बहिणी आणि भावांनी महायुतीला मतदान केलं. ही योजना लोकांपर्यंत पोहोचली आणि त्यांच्या विश्वासाचं फलित यशस्वी झालं.

महायुतीच्या यशानंतर मुख्यमंत्रिपदावर कोण दावा करणार, याबाबत चर्चेला सुरुवात झाली आहे. मात्र, शिंदेंनी स्पष्ट केलं की, ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असं ठरलेलं नाही. सर्व नेते एकत्र बसून निर्णय घेतील.

त्यामुळे भाजपच्या मुख्यमंत्रिपदासाठी जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा कायम ठेवला आहे. शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी सांगितलं की, महायुतीचं हे यश एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील कामगिरीमुळे मिळालं. लाडकी बहीण योजना आणि त्यांच्या प्रयत्नांमुळेच महायुतीची ताकद वाढली.

महायुतीचा विजय हा भाजप-शिंदे गटाच्या एकत्रित ताकदीचा परिणाम असला तरी मुख्यमंत्रिपदावर कोणाची निवड होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिंदे गटाचं म्हणणं आहे की, एकनाथ शिंदेंनी केलेल्या कामामुळे जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला. त्यामुळे यशाचं श्रेय त्यांनाच जातं.

महायुतीच्या विजयासोबतच मुख्यमंत्रिपदाचा निर्णय महत्त्वाचा ठरणार असून त्यावर राज्यातील राजकीय समीकरणं अवलंबून असतील.

हिंदुस्थान समाचार / Shuddhodana Mangorao


 rajesh pande