आंबेगावात निसटता विजय; वळसे पाटील अवघ्या पंधराशे मतांनी विजयी
पुणे, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। आंबेगाव विधानसभा मतदार संघाच्या अटीतटीच्या लढतीत सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा निसटता विजय मिळविला आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांचा 1523 मतांनी पराभव केला आहे. विधानसभेची ही निवडणूक अत्यंत
वळसे पाटील


पुणे, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। आंबेगाव विधानसभा मतदार संघाच्या अटीतटीच्या लढतीत सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा निसटता विजय मिळविला आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांचा 1523 मतांनी पराभव केला आहे.

विधानसभेची ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली असून पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत मताधिक्यात चढ-उतार होत होता. शेवटच्या विसाव्या फेरीत निकाल निश्चित होऊन सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील 1523 मतांनी विजयी झाले आहेत. एकूण 2 लाख 22 हजार 515 मतांपैकी वळसे पाटील यांना 1 लाख 6 हजार 888 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे देवदत्त निकम यांना 1 लाख 5 हजार 365 मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार देवदत्त निकम यांनी 2985 मते घेतली. मनसेचे उमेदवार सुनील इंदोरे यांना केवळ 1483 मते मिळाली आहेत. नोटाला 1157 मते मिळाली आहेत. मतमोजणी केंद्रामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. पोस्टल मतदानामध्ये व पहिल्या फेरीत निकम यांना आघाडी मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या फेरीत वळसे पाटील पुढे गेल्यानंतर चौथ्या फेरीत निकम यांना आघाडी मिळाली. पाचवी व सहावी फेरी वळसे पाटील यांच्या बाजूने गेल्यानंतर सातव्या फेरीत निकम यांनी पुन्हा आघाडी घेतली. त्यानंतर मात्र आठव्या, नवव्या, दहाव्या व अकराव्या फेरीत लगातार वळसे पाटील यांना आघाडी मिळवली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande