अफगाणिस्तानात स्फोट, तालिबानी मंत्री ठार
काबूल, 12 डिसेंबर (हिं.स.)। अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये स्फोट झाला आहे.ज्यामध्ये तालिबानचे निर्वासित मंत्री खलील रहमान हक्कानी आणि त्यांच्या तीन अंगरक्षकांसह १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे बुधवारी काबूलमधील निर्वासित मंत्रालयाच्या कंपाऊंडम
इतर 2 जण ठार


काबूल, 12 डिसेंबर (हिं.स.)। अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये स्फोट झाला आहे.ज्यामध्ये तालिबानचे निर्वासित मंत्री खलील रहमान हक्कानी आणि त्यांच्या तीन अंगरक्षकांसह १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे बुधवारी काबूलमधील निर्वासित मंत्रालयाच्या कंपाऊंडमध्ये हा स्फोट झाला आहे. ज्यामध्ये १२ लोकं ठार झाले आहेत. तालिबानचे स्थलांतर मंत्री आणि तालिबानचे गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी यांचे काका खलीलुर रहमान हक्कानी हे काबूलमध्ये झालेल्या स्फोटात ठार झाले आहेत. अफगाणिस्तानचे स्थानिक मीडिया टोलो न्यूजने ही माहिती दिली आहे.

राजधानी काबूलमध्ये मंत्रालयाच्या आवारात स्फोट झाल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. हा स्फोट कोणी घडवून आणला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तालिबानचा प्रभाव असलेल्या भागात तालिबानी मंत्र्यालाच स्फोटाने लक्ष्य करण्यात आल्याची घटना प्रथमच घडली आहे. खलील रहमान हक्कानी हे तालिबानचे अंतर्गत मंत्री सिराजुद्दीन हक्कानी यांचे काका आणि हक्कानी नेटवर्कमधील एक प्रमुख व्यक्ती होते. ऑगस्ट २०२१ मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर ७ सप्टेंबर २०२१ रोजी निर्वासितांचे कार्यवाहक मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

इस्लामिक स्टेट आणि तालिबान यांच्यात सध्या संघर्ष सुरु आहे. त्यामुळे हा हल्ला इसिसकडून केला गेला असल्याची प्राथमिक माहिती आहे. पण या प्रकरणात कोणत्याही संघटनेने अद्याप जबाबदारी स्वीकारलेली नाही. इस्लामिक स्टेट (ISIS-K)ने वारंवार असे हल्ले केले आहेत, ज्यामुळे अलीकडील काही महिन्यांत तालिबान सरकारसोबत त्यांचा तणाव वाढला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Avinash


 rajesh pande