बीजिंग, 19 डिसेंबर (हिं.स.)। चीन दौऱ्यावर असलेले NSA अजित डोवाल यांनी बुधवारी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची बीजिंगमध्ये भेट घेतली. पूर्व लडाखमधील सीमा तंट्यामुळे गेल्या चार वर्षांपासून विकोपाला गेलेले द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल व चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी या भेटीदरम्यान चर्चा केली. भारतीय वेळेनुसार सकाळी 8 वाजता दोघांची भेट सुरू झाली.
भारत व चीनमध्ये असलेल्या मतभेदांच्या मुद्द्यांवर २३वी विशेष प्रतिनिधी बैठक सुमारे पाच वर्षांनंतर होत आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता राखण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांबद्दल डोवाल व यांग ली यांनी चर्चा केली.पूर्व लडाखमध्ये सीमेवरून सैन्य मागे नेण्याच्या तसेच गस्त घालण्यासंदर्भात भारत व चीनमध्ये २१ ऑक्टोबर रोजी करार झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात जी बोलणी झाली त्यानुसार चीनने भारताशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली होती. बैठकीनंतर चीनने सांगितले की,भारतासोबत असलेल्या मतभेदांवर तोडगा काढण्याची चीनची प्रामाणिक इच्छा आहे, असे त्या देशाच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते लिन जिआन यांनी सांगितले. दोन्ही देशांचे संबंध पूर्वीप्रमाणे सुरळीत व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही ते म्हणाले.
2019 नंतर ही पहिलीच वेळ आहे की भारताचा वरिष्ठ अधिकारी चीनला भेट देत आहे. यापूर्वी 2019 मध्ये परराष्ट्र मंत्री जयशंकर बीजिंगला गेले होते.पूर्व लडाखमधील सीमावादावरून भारत आणि चीनमध्ये चार वर्षांपासून तणाव होता. दोन वर्षांच्या वाटाघाटीनंतर, 21 ऑक्टोबर रोजी दोन्ही सैन्याने वादग्रस्त बिंदू डेपसांग आणि डेमचोकमधून माघार घेण्याचा करार झाला. यानंतर 25 ऑक्टोबरपासून दोन्ही देशांच्या सैन्याने वादग्रस्त ठिकाणांवरून माघार घ्यायला सुरुवात केली.LACवर गस्तीबाबत भारत आणि चीन यांच्यात झालेल्या करारावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी 27 ऑक्टोबर रोजी सैन्य मागे घेणे ही पहिली पायरी असल्याचे सांगितले होते. पुढील पायरी म्हणजे तणाव कमी करणे. तणाव कमी करण्यासाठी दोन वर्षांत 38 बैठका झाल्या.करारानुसार, दोन्ही लष्कर एप्रिल 2020 पासून त्यांच्या पूर्वीच्या स्थितीत परतले आहेत. एप्रिल 2020 पूर्वी ज्या भागात ते गस्त घालत असत त्याच भागात आता सैन्य गस्त घालत आहेत. याशिवाय कमांडर स्तरावरील बैठक अजूनही सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Avinash