आठवणीतले सुबलदा... २५ डिसेंबर रोजी श्री शिवाजी मंदिर, दादर येथे
मुंबई, 21 डिसेंबर, (हिं.स.)।प्रख्यात शास्त्रीय नृत्यतज्ञ श्रीमती डॉ. किशु पाल संचालित नृत्यालिका प्रतिष्ठान च्या ३८ व्या वर्धापन दिनानिमित्त सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक कै. सुबल सरकार यांना श्रद्धांजली प्रित्यर्थ आठवणीतले सुबलदा... हा नृत्यमय कार्यक्र
Subal


मुंबई, 21 डिसेंबर, (हिं.स.)।प्रख्यात शास्त्रीय नृत्यतज्ञ श्रीमती डॉ. किशु पाल संचालित नृत्यालिका प्रतिष्ठान च्या ३८ व्या वर्धापन दिनानिमित्त सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक कै. सुबल सरकार यांना श्रद्धांजली प्रित्यर्थ आठवणीतले सुबलदा... हा नृत्यमय कार्यक्रम बुधवार दि. २५ डिसेंबर, २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता श्री. शिवाजी मंदिर नाट्यगृहात सादर होणार आहे. सदर कार्यक्रमात कै. सुबल सरकार यांच्या नृत्य दिग्दर्शित गाण्यांवर नृत्यालिका प्रतिष्ठान च्या विविध शाखेतील १२५ उत्साही विद्यार्थ्यांचे नृत्य सादरीकरण होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गवळी उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रख्यात नृत्य दिग्दर्शक कै. सुबल सरकार यांनी आपल्या नृत्य दिग्दर्शनाने एक काळ गाजवला होता. त्यांच्या लाजवाब नृत्य दिग्दर्शनाने अनेक चित्रपट सुपरहिट झाले होते. त्यांनी गाजवलेल्या सुवर्णकाळात अनेक दिग्गज अभिनेत्रीं व अभिनेत्यांना त्यांनी आपल्या तालावर नाचवले होते. त्यांच्या आठवणी, त्यांनी नृत्य दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटातील गीते नृत्यरूपात या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहेत.

१९८६ साली स्थापन झालेल्या नृत्यालिकाच्या आज संपूर्ण महाराष्ट्र व विदेशात जवळजवळ ३६ शाखा आहेत व अनेको विद्यार्थी - विद्यार्थीनी नृत्याचे धडे घेत आहेत. त्यांच्या शिक्षणक्रमात शास्त्रीय नृत्यात भरतनाट्यम, कुचीपुडी, लोकनृत्य आणि भारतीय बॅले नृत्याचा समावेश आहे. नृत्यालिकाच्या कलाकारांनी आतापर्यंत तिरूपती फेस्टीवल, गोवा फेस्टीवल, शिवा फेस्टीवल, वर्तुलम तसेच विविध वाहिन्यावरील प्रतिष्ठित कार्यक्रमातून सहभाग घेतला आहे. तसेच विविध मालिका व सिनेमामधूनही नृत्यालिकाच्या कलाकारांनी आपल्या नृत्याचा आविष्कार सादर केला आहे. नृत्यालिकाच्या संचालिका श्रीमती डॉ. किशु पाल यांना हैदराबाद शासनातर्फे ‘नृत्य प्रचार रत्न’ तसेच महाराष्ट्र गौरव व शिक्षक रत्न त्याचप्रमाणे तिरूपतीतर्फे ‘नृत्य शिरोमणी’ आणि एकता कल्चरल अॅकेडमी या संस्थेने त्यांना नृत्यासाठी गोपीकृष्ण पुरस्कार देवून गौरविले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी ‘भरतनाटयम’ नृत्याविषयी माहीती आणि महत्व विशद करण्यासाठी संदर्भ पुस्तकाचं लेखन केलं आहे. त्यांनी आतापर्यंत भारत, युरोप आणि एशियामधील अनेक देशांमध्ये आपल्या अभिजात नृत्याचे कार्यक्रम यशस्वीरित्या करून तिथल्या रसिकांची वाहवा मिळविली आहे. त्यांच्या 'वर्तुलम', ‘ऊर्जा’ व 'अनुष्ठान' या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. ‘कॅडबरी’, ‘एच.डी.एफ.सी’, ‘टाटा’, ‘रिलायन्स’, ‘आयसीआयसीआय’, ‘कोलगेट - पामोलिव्ह’ यासारख्या प्रतिष्ठित कंपन्यांमधूनही श्रीमती डॉ. किशु पाल यांनी आपल्या नृत्याचा आविष्कार सादर केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande