रत्नागिरी : जळगाव विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी पार्थ गांधीची निवड
रत्नागिरी, 10 फेब्रुवारी, (हिं. स.) : जळगाव येथे होणार असलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ पुरुष
रत्नागिरी : जळगाव विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी पार्थ गांधीची निवड


रत्नागिरी, 10 फेब्रुवारी, (हिं. स.) : जळगाव येथे होणार असलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ पुरुष क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील पार्थ गांधी या विद्यार्थ्याची निवड झाली आहे.

गेल्या ५ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत मुंबई विद्यापीठ आणि मुंबईतील डी. जी. महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठ पुरुष क्रिकेट स्पर्धा आणि विद्यापीठ पुरुष क्रिकेट संघ निवड चाचणी पार पडली. कालिना स्पोर्ट्स कॅम्पस क्रिकेट मैदानावर ही चाचणी झाली. या स्पर्धेतून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जळगाव येथे १८ ते २६ फेब्रुवारी या काळात होणार असलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेकरिता खेळाडूंची निवड झाली. त्यात मुंबई विद्यापीठ पुरुष क्रिकेट संघात रत्नागिरीच्या पार्थ गांधी या प्रथम वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्याची निवड झाली आहे.रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्यासह पदाधिकारी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पार्थला शुभेच्छा दिल्या आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande