श्री घंटाळी देवी चषक स्पर्धा : हिरानंदानी फाऊंडेशन स्कूल विजयी
ठाणे, 10 फेब्रुवारी, (हिं.स.) घंटाळी प्रबोधिनी संस्था, ठाणे व सोवेनिर क्लब आयोजित मुंबई क्रिकेट असो
श्री घंटाळी देवी चषक स्पर्धा : हिरानंदानी फाऊंडेशन स्कूल विजयी


ठाणे, 10 फेब्रुवारी, (हिं.स.) घंटाळी प्रबोधिनी संस्था, ठाणे व सोवेनिर क्लब आयोजित मुंबई क्रिकेट असोसिएशन संलग्न श्री घंटाळी देवी चषक 2024 या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात हिरानंदानी फाऊंडेशन स्कूलच्या संघाने विजय संपादन केला.

ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह येथे शनिवार, 10 फेब्रुवारी रोजी हिरानंदानी फाऊंडेशन स्कूल आणि श्रीरंग विद्यालय या संघांमध्ये हा सामना झाला. हिरानंदानी फाऊंडेशन स्कूलने 40 षटकांत 230 धावा केल्या. त्यानंतर खेळण्यास आलेल्या श्रीरंग विद्यालयाच्या संघाने 16 षटकांत सर्व बाद फक्त 41 धावा केल्या. हिरानंदानी फाऊंडेशन स्कूलच्या तनय नगरकर याने 100 धाव्या केल्या. त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. तसेच श्रीरंग विद्यालयाच्या हशैन शेख याने 34 धावांत 3 बळी घेतले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande