किरकोळ कारणावरून रिक्षा चालकाची अंबड परिसरात हत्या
नाशिक, ११ फेब्रुवारी, (हिं.स) : किरकोळ कारणावरून एका रिक्षाचालकाने दुसऱ्या रिक्षा चालकाच्या डोक्यात
किरकोळ कारणावरून रिक्षा चालकाची अंबड परिसरात हत्या


नाशिक, ११ फेब्रुवारी, (हिं.स) : किरकोळ कारणावरून एका रिक्षाचालकाने दुसऱ्या रिक्षा चालकाच्या डोक्यात पहार व दंडुका घालून खून केल्याची घटना काल रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना रात्रीच अटक केली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मयत शंकर गाडगीळ याची बायको आरोपी सोनू कांबळे याच्या प्रेयसीकडे चुगल्या करत होती. त्यामुळे दोघांमध्ये कायम वाद व्हायचे. याचा राग अनावर झाल्याने सोनू कांबळे हा तिचा काटा काढण्यासाठी तिच्या घरी गेला होता.

दरम्यान, शंकर गाडगीळ हा मध्ये पडल्याने तो वार त्याच्या डोक्यात पडला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने शंकरचा यात मृत्यू झाला. चुंचाळे पोलिसांनी त्वरित तपास सुरू करत सोनू कांबळे, देवेंद्र कांबळे यांच्यासह आणखी एकाला अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande