नाशकात गुंडाचे अपहरण करत निर्घृण हत्या
नाशिक, ११ फेब्रुवारी (हिं.स.) सराईत गुंडाचे अपहरण करत पाच जणांनी त्याची निर्घृण हत्या केली. पंचवटीतू
नाशकात गुंडाचे अपहरण करत निर्घृण हत्या


नाशिक, ११ फेब्रुवारी (हिं.स.)

सराईत गुंडाचे अपहरण करत पाच जणांनी त्याची निर्घृण हत्या केली. पंचवटीतून सुरु झालेला हा थरार माेखाडा भागात जाऊन संपला. या प्रकरणी पंचवटी पाेलिसांनी अपहरणासह खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तर, युनिट एकच्या पथकाने या हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधारास अटक केली आहे.

संदेश चंद्रकांत काजळे(३५, रा. विजयनगर, सिडकाे) असे मृताचे नाव आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास सुरु असताना गुन्हेशाखा युनिट एकच्या पथकास संशयित स्वप्निल उनव्हणे याची माहिती मिळाली. ताे एका सिव्हर रंगाच्या विनानंबर प्लेटच्या इको वाहनामध्ये त्र्यंबकेश्वर परिसरात फिरत असल्याची माहिती कळाली. काजले यत्यास जिवे ठार मारुन मोखाडा परिसरात जाळून टाकले.

काजळे याने काही वर्षांपूर्वी दाेघा डीजेवादकांना मारहाण करत सिगारेटचे चटके दिले हाेते. वाढदिवस सुरु असताना मद्याच्या नशेत त्याने इतर नऊ जणांसह या वादकांचा लैंगिक छळ करुन मारहाण केली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande