पुढील राजकीय दिशेबाबत लवकरच भूमिका स्पष्ट करणार - अशोक चव्हाण
मुंबई, 12 फेब्रुवारी (हिं.स.) - आज मी विधानसभा अध्यक्षांना भेटून काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यत्
अशोक चव्हाण


मुंबई, 12 फेब्रुवारी (हिं.स.) - आज मी विधानसभा अध्यक्षांना भेटून काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. काँग्रेस कार्यसमिती, पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व आणि विधीमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचाही मी राजीनामा दिला आहे. काँग्रेसमध्ये असताना मी प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले. कोणाबद्दल मी तक्रार करणार नाही. वैयक्तिक कोणाबद्दलही माझ्या मनात वेगळी भावना नाही. पुढील राजकीय दिशेबाबत अद्याप मी काहीही निर्णय घेतलेला नाही. याबाबत विचार करून एक-दोन दिवसात माझी भूमिका स्पष्ट करेल, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी माध्यमांसमोर दिली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande