पुणे : तरुणीवर कारमध्ये बलात्कार
पुणे, 12 फेब्रुवारी (हिं.स.) : तरुणीला भेटण्यासाठी बोलावून तिच्यावर कारमध्येच बलात्कार केल्याची घटन
संग्रहित


पुणे, 12 फेब्रुवारी (हिं.स.) : तरुणीला भेटण्यासाठी बोलावून तिच्यावर कारमध्येच बलात्कार केल्याची घटना पुण्यातील वाघोलीत घडली आहे. या प्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव बोराटे ( वय, २७ ) असे गुन्हा दाखल करण्यात केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार,दोघांमध्ये मैत्री होती. गौरवने मुलीला भेटण्यासाठी बोलवले. भेटायला आली नाहीस तर जीव देईल, अशी धमकी दिली. ती आल्यानंतर त्याने तिला कारमध्ये बसायला सांगितलं व कारमध्येच तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. याबाबत कोणाला काही सांगितले तर वडिलांना मारुन टाकण्याची धमकी दिली. गौरव हा वारंवार धमकी देत असल्याने मुलीने त्याच्या त्रासाला कंटाळून त्याच्यासोबत बोलणे बंद केले. याचा राग आल्याने त्याने ती राहत असलेल्या सोसायटीत जाऊन तिच्या वडीलांना शिवीगाळ केली. या सर्व प्रकारानंतर तरुणीने पोलीसात धाव घेवून फिर्याद दिली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande