अयोध्या : केजरीवाल व मान यांनी घेतले श्रीरामांचे दर्शन
अयोध्या, 12 फेब्रुवारी (हिं.स.) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत
केजरीवाल व मान यांनी घेतले श्रीरामांचे दर्शन


अयोध्या, 12 फेब्रुवारी (हिं.स.) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज, सोमवारी अयोध्येत जाऊन रामललाचे दर्शन घेतले. दोन्ही नेत्यांनी राम मंदिरातील विशेष प्रार्थनेतही भाग घेतला. बाहेर आल्यानंतर केजरीवाल यांनी राम मंदिराचे वर्णन अतिशय सुंदर आणि भव्य असून येथे आल्यावर मला आनंद झाल्याचे सांगितले.

आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्यांच्या अयोध्या भेटीपूर्वी एक दिवस आधी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, त्यांच्या सरकारचे मंत्री आणि विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील 325 हून अधिक सदस्यांनी रविवारी मंदिराला भेट दिली होती. यात समाजवादी पक्षाचे (एसपी) सदस्य सहभागी झाला नव्हता. गेल्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्मित राम मंदिरात भगवान श्री राम 'श्री रामलला' या बालस्वरूपाचा अभिषेक करण्यात आला. तेव्हापासून भाविकांच्या प्रचंड गर्दीबरोबरच विविध राज्यांतील राजकीय व्यक्ती आणि मान्यवर मंडळी मंदिरात दर्शनासाठी येत आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande