नाशिकच्या अशोका युनिव्हर्सल स्कूलने 'रासबिहारी इंटरस्कूल फुटबॉल कप' जिंकला
नाशिक, १२ फेब्रुवारी (हिं.स.) - रासबिहारी इंटरस्कूल फुटबॉल चषकाचा बहुप्रतिक्षित समारोप समारंभ नुकताच
नाशिकच्या अशोका युनिव्हर्सल स्कूलने 'रासबिहारी इंटरस्कूल फुटबॉल कप' जिंकला


नाशिक, १२ फेब्रुवारी (हिं.स.) - रासबिहारी इंटरस्कूल फुटबॉल चषकाचा बहुप्रतिक्षित समारोप समारंभ नुकताच शाळेच्या मैदानावर झाला.

नाशिक जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद, रासबिहारी शाळेच्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रिती पाठक, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शिल्पा दवे, प्रशासक परमजीत कौर, शाळेचे प्रशिक्षक गौरव कडलग, शालेय अभ्यासक आणि रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलचे सपोर्ट स्टाफ यावेळी उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांनी रासबिहारी इंटरस्कूल फुटबॉल चषक सुरू करण्यासाठी रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलने घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक केले आणि खेळाडूंना त्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या संधींचाही उल्लेख केला.

अंतिम सामना अशोका युनिव्हर्सल स्कूल आणि दिल्ली पब्लिक स्कूल यांच्यात झाला.

अशोका स्कूलने रासबिहारी फूट बॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावले. तर, अशोका युनिव्हर्सल स्कूलकडून मास्टर अक्षत चौधरीला सामनावीर घोषित करण्यात आले.समारोप समारंभाचे सूत्रसंचालन रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केले. बक्षीस वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande