शुभांगी अत्रेने घेतला आध्यात्मिकतेचा अनुभव !
मुंबई, 12 फेब्रुवारी (हिं.स.) : आजच्या व्यस्त जीवनात आधुनिक जगातील मागण्यांमुळे तणाव येऊ शकतो, पण यो
शुभांगी अत्रे 


मुंबई, 12 फेब्रुवारी (हिं.स.) : आजच्या व्यस्त जीवनात आधुनिक जगातील मागण्यांमुळे तणाव येऊ शकतो, पण योगा या तणावापासून आराम मिळण्यासाठी वरदान ठरू शकतो. एण्ड टीव्हीवरील मालिका 'भाबीजी घर पर है'मधील अंगूरी भाबी ऊर्फ शुभांगी अत्रे यांनी कोईम्बतूरमध्ये शांतमय योगा व आध्यात्मिकतेचा अनुभव घेतला, ज्यामधून आध्यात्मिकतेचा शोध, उत्साह व आत्म-शोध मिळाला.

या आध्यात्मिक अनुभवाबाबत सांगताना शुभांगी अत्रे ऊर्फ अंगूरी भाबी म्हणाल्या, ''कोईम्बतूरमधील ईशा फाऊंडेशनमध्ये परंपरा, आधुनिकता व नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळते. प्रसिद्ध योगा सेंटरमध्ये व्यतित केलेल्या दिवसामधून शांतमय वातावरणाचा अनुभव मिळाला. उत्तमरित्या सुसज्ज आश्रमाने उत्साहाचा अनुभव दिला, ज्यामुळे मला चिंतन, योगा करता आला आणि ध्यानलिंगच्या रम्य वातावरणात भारावून जाता आले. लिंग भैरवी देवी सेंटरला भेट दिल्यानंतर अधिक शांततेचा अनुभव मिळाला. क्लेश नाशन क्रिया आणि देवी अभिषेकमशी संलग्न होत माझ्या देवीच्या दैवी उपस्थितीची जाणीव झाली. लिंग भैरवी देवीला अकरा भोग अर्पण करण्यामध्ये मी सामील झाले, तसेच आध्यात्मिक ऊर्जेला शुद्ध करण्यासाठी अग्नी व घटकांचा वापर करत शुद्धीकरण प्रथेचा आनंद घेतला. सायंकाळी धमाल कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, जेथे समविचारी व्यक्ती समूह चिंतन, नामजप आणि चिंतनशील चर्चेसाठी एकत्र आले. तेथील विशेष पाककलांनी शरीरामध्ये पोषण व उत्साहाची भर केली, जे सुसंगत संतुलन होते. आध्यात्मिक वातावरण आणि सकारात्मक ऊर्जेने माझ्या मनावर दीर्घकालीन प्रभाव पाडला. तेथे वेळ व्यतित करत मी आत्म-शोध आणि आध्यात्मिकतेचा अनुभव घेतला आहे. या प्रवासाने माझ्या मनावर अमिट छाप निर्माण केली आहे आणि मी आरोग्याची काळजी घेण्यासह आध्यात्मिकतेचे पालन करेन. परंपरा व समकालीन सौंदर्याचा संपन्न वारसा असलेले कोईम्बतूर निश्चितच मनाला शांती देणारे गंतव्य आहे.'' कोईम्बतूरमध्ये फेरफटका मारण्याबाबत शुभांगी पुढे म्हणाल्या, ''कोईम्बतूरमधील स्वादिष्ट पाककलांचा आस्वाद माझ्या भेटीमधील खास बाब ठरली. प्रसिद्ध दक्षिण भारतीय डोसापासून स्थानिक पाककला जसे कोठू परोट्टा अशा विविध पाककलांचा आस्वाद घेण्याचा अनुभव आनंददायी होता. स्थानिक बाजारपेठांमध्ये फेरफटका मारणे उत्साहवर्धक होते, पारंपारिक रेशमी साड्या, हस्तकला वस्तू आणि मसाले खरेदी करण्याच्या अनुभवाने माझी ही ट्रिप अधिक उत्साहवर्धक केली.''

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande