उपराष्ट्रपतींची मंगळवारी आसामच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांच्या वितरण सोहळ्याला उपस्थिती
नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी (हिं.स.) - उपराष्ट्रपती जगदीप धनखड 13 फेब्रुवारी रोजी आसाममधील गुवाहाटी ये
उपराष्ट्रपतींची मंगळवारी आसामच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांच्या वितरण सोहळ्याला उपस्थिती


नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी (हिं.स.) - उपराष्ट्रपती जगदीप धनखड 13 फेब्रुवारी रोजी आसाममधील गुवाहाटी येथे भेट देतील. या एक दिवसीय दौऱ्यात, उपराष्ट्रपती धनखड आसाम राज्याचे सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या आसाम बैभव, आसाम सौरव आणि आसाम गौरव या पुरस्कारांच्या वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande