विहिंपचे स्वयंसेवक विशेष रेल्वेने जाणार अयोध्याधामला
नाशिक १२ फेब्रुवारी (हिं.स.) 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम लल्लाची भव्यदिव्य प्राणप्रतिष्ठ
विहिंपचे स्वयंसेवक विशेष रेल्वेने जाणार अयोध्याधामला


नाशिक १२ फेब्रुवारी (हिं.स.) 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम लल्लाची भव्यदिव्य प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. देशाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या सोहळ्याचे आपण साक्षीदार आहोत.प्रभू श्रीराम मंदिराची ओढ राम भक्तांना लागल्याने प्रभू श्रीराम मंदिराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. नाशिक(ग्रामीण)मनमाड येथुन विश्व हिंदू परिषदेचे स्वयंसेवक विशेष रेल्वेने दि १४ फेब्रुवारी रोजी अयोध्याधामला रवाना होणार असल्याची माहिती बजरंगदल जिल्हा संयोजक समाधान कापसे यांनी दिली आहे.

विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने विहिंप व रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकांसाठी अयोध्या धाम श्रीराम मंदिर दर्शनाची विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे. २० डब्यांची (१४४० प्रवासी संख्या) विशेष रेल्वे १४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वा.छ. शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून सुटेल. सायंकाळी ९ वा.नगर येथून मनमाड मार्गे निघेल. दि.१५ फेब्रुवारी रोजी दुपारी श्री अयोध्याधाम येथे पोहोचेल.निवास व्यवस्था कारसेवापुरम येथे असेल.

१६ फेब्रुवारी रोजी सकाळी दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. १६ फेब्रुवारी रोजी दुपारनंतर विशेष रेल्वे मनमाड, दौंड, पुणे मार्गे कोल्हापूर साठी निघेल.व दिनांक १८ तारखेला पुणे व कोल्हापूर येथे पोहोचेल.

या यात्रेचे आयोजन पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री संजय मुद्राळे,महेश करपे,निखिल कुलकर्णी, नितीन वाटकर,संकेत राव यांनी केले आहे, अशी माहिती देविदास वरुंगसे जिल्हा मंत्री राहुल सोनकुल सह मंत्री आशा ताई वाणी,विकी वरंदळ,समाधान कापसे यांनी दिली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande