रत्नागिरीत राजेंद्र माने अभियांत्रिकीमध्ये क्लाऊड व डेवऑप्सवर कार्यशाळा संपन्न
रत्नागिरी, 12 फेब्रुवारी, (हिं. स.) : आंबव (ता. संगमेश्वर) येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचाल
राजेंद्र माने


रत्नागिरी, 12 फेब्रुवारी, (हिं. स.) : आंबव (ता. संगमेश्वर) येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचालित राजेंद्र माने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये कॉम्प्युटर शाखेतील विद्यार्थ्यांसाठी पाच दिवसांची कार्यशाळा पार पडली. तृतीय वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना यामध्ये “एडब्ल्यूएस क्लाऊड अँड डेवऑप्स” विषयी पुण्यातील विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी येथील तज्ज्ञ डॉ. विशाल मेश्राम आणि सिद्धार्थ सुतार यांनी मार्गदर्शन केले.

समन्वयक प्रा. मानसी गोरे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात ही कार्यशाळा सध्याच्या अभ्यासक्रमाला पूरक असून त्याचा विद्यार्थ्यांना पदव्युत्तर काळातही विशेष फायदा होईल, असे सांगितले. यावेळी व्यासपीठावर मान्यवरांसमवेत विभागप्रमुख प्रा. लक्ष्मण नाईक उपस्थित होते.

यानंतर ट्रेनर डॉ. विशाल मेश्राम यांनी पुढील पाच दिवस लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमविषयी मूलभूत माहिती देऊन “एडब्ल्यूएस क्लाऊड अँड डेवऑप्स”सारख्या विविध सॉफ्टवेअरमध्ये विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले.

कार्यशाळेच्या अंतिम सत्रामध्ये संबंधित विषयातील नवीन तंत्रज्ञान विशद करून विद्यार्थ्यांना त्याचे महत्त्व स्पष्ट केले. विविध सॉफ्टवेअरवर आधारित उद्योगांमध्ये सध्या उपलब्ध असणाऱ्या रोजगार संधीची त्यांनी माहिती दिली. तसेच त्यामधील सध्याची परिस्थिती सांगताना स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी विविध कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर शाखेतील ७० विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande