कांद्याला विदेशात हजारोचा, देशात मात्र शेकडोचा भाव
नाशिक १२ फेब्रुवारी (हिं.स.) - देशामध्ये कांद्याची निर्यात बंदी लागू केल्यानंतर आता कांद्याची तस्करी
कांदा


नाशिक १२ फेब्रुवारी (हिं.स.) - देशामध्ये कांद्याची निर्यात बंदी लागू केल्यानंतर आता कांद्याची तस्करी देखील सुरू झाली आहे. त्यामुळे विदेशामध्ये भाव खाणारा कांदा हा चोरट्या मार्गाने विदेशात पोहोचत आहे. पण या चोरीचा व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांवरती मात्र कोणतीही कारवाई सरकारकडून होत नाहीये.

भारतामध्ये असलेल्या निवडणुका लक्षात घेऊन केंद्र सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये 31 मार्च 2024 पर्यंत देशातून कांदा निर्याती वरती बंदी घालण्यात आली. त्यामुळे आधीच पाऊस आणि दुष्काळामुळे कांद्याचे उत्पादन कमी होतं त्यामुळे कांद्याचे भाव हे ज्यावेळी म्हणजे सर्वसाधारण दीड महिन्यापूर्वी बंदी घातली. त्यावेळी पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास पोहोचले होते. पण निर्यात बंदी घातल्यानंतर हेच भाव आज 6 00 रुपये प्रतिक्विंटल वरती आले. या सर्वांचा फायदा शेतकऱ्यांना मात्र काही झाला नाही.

भारतामध्ये कांद्या निर्यात बंदी आहे. त्यामुळे कांदा हा विदेशात जाऊ शकत नाही. भारतीय कांद्याला आणि विशेष करून नाशिकमध्ये तयार होणाऱ्या कांद्याला आखाती देशांबरोबरच इंग्लंड ,चीन, बांगलादेश ,अमेरिका ,श्रीलंका, या देशांसह काही इतर देशांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर मागणी असते पण कांद्याचे माहेरघर असलेल्या नाशिक सह देशातील कांद्यावरती निर्यात बंदी आल्यामुळे या ठिकाणी कांद्याचा दर कोसळला. परंतु विदेशात मात्र याच कांद्याचा दर वाढला. त्यामुळे मागणी देखील वाढत गेली आणि याचाच फायदा तस्करी करणारा चोरट्यांनी घेतला आणि द्राक्ष डाळिंब टोमॅटो या साठी तयार करण्यात येत असलेल्या पेट्यांच्या माध्यमातून कांद्याची तस्करी देखील केली जाऊ लागली आणि विदेशात हा भाव हजारोंच्या घरात पोहोचला. पण याचा फायदा मात्र शेतकऱ्यांना झाला नाही तर तो थेट चोरी चा उपयोग करून व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना झाला. त्यावर सरकारकडून मात्र कोणतीही कारवाई झाली नाही.

निर्यात बंदी उपाय चोरी करणाऱ्यांवर ती कारवाई करा

या सर्व प्रश्नांबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना अधिक आक्रमक झाली आहे. या संघटनेच्या वतीने आता केंद्र सरकारला निर्यात बंदी उठवण्याची मागणी केली आहे. कारण शेतकऱ्यांना मातीमोल भावामध्ये पीक विकावा लागत आहे आणि चोरी करणारे चोरटे मात्र मोकाट आहे त्यांच्यावरचे देखील कारवाई करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. - संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande