रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे ३ मार्चला श्री गजानन सायकल फेरी
रत्नागिरी, 29 फेब्रुवारी, (हिं. स.) : श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त येथील रत्नागिरी सायकलिस्ट
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे ३ मार्चला श्री गजानन सायकल फेरी


रत्नागिरी, 29 फेब्रुवारी, (हिं. स.) : श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त येथील रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे येत्या रविवारी (दि. ३ मार्च) नाचणे पॉवरहाऊस येथील श्री गजानन महाराज मंदिर ते गोळप येथील श्री गजानन महाराज मंदिरपर्यंत सायकल फेरीचे आयोजन केले आहे.

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने गेली तीन वर्षे विविध विषयांसाठी सायकल फेरी, सायकल संमेलन, सायकल स्पर्धा अशा उपक्रमांचे आयोजन केले आहे. रत्नागिरी आणि आसपासच्या परिसरात सायकल चळवळ वाढावी म्हणून क्लबने भरपूर प्रयत्न केले आहेत. त्यासाठी विधी दिन, स्वस्थ इंडिया सायकल राइड, मतदार जनजागृती सायकल फेरी, हर घर तिरंगा सायकल फेरी, अयोध्येत श्रीराम मंदिर स्थापनेनिमित्त सायकल फेरी अशा अनेक फेऱ्यांचे यशस्वी आयोजन केले आहे.

रत्नागिरीत सायकल चालवणाऱ्यांची संख्यासुद्धा वाढली आहे. या अनुषंगाने श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त सायकल फेरी आयोजित केली आहे. रविवारी सकाळी ६.१५ वाजता नाचणे, पॉवर हाऊस येथील श्री गजानन मंदिर येथून फेरीला सुरवात होईल. ही फेरी मारुती मंदिरमार्गे जयस्तंभ येथे ६.३० वाजता पोहोचेल. तेथून शहरातील खालच्या भागातील सायकलस्वार सहभागी होतील. त्यानंतर ही फेरी मुख्य मार्गावरून भाट्ये, कुर्ली फाटा, कसोप फाटा, वायंगणी फाटा, जोशी कंपाउंड, कोळंबे फाटा, फिनोलेक्स फाटा मार्गे गोळप येथील श्री गजानन महाराज मंदिरात पोहोचणार आहे. हे अंतर साधारण २८ किमी आहे.

सायकलस्वारांनी येताना सोबत शेंगदाणा चिक्की, पाण्याची बाटली आणावी. जास्तीत जास्त सायकलस्वारांनी या फेरीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने केले आहे. अधिक माहितीसाठी अमित कवितके (8275655111), दर्शन जाधव (9970398242), डॉ. नितीन सनगर (9689866099), महेश सावंत (7744085581), आरती पानवलकर (9867433796) किंवा श्रद्धा रहाटे (8806424256) यांच्याशी संपर्क साधावा.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande