इस्राइलकडून आतापर्यंत ३० हजार पॅलेस्टिनी महिला-मुलांची हत्या
वाॅशिंग्टन, १ मार्च (हिं.स.) : हमास या दहशतवादी संघटनेकडून ऑक्टोबर २०२३ मध्ये इस्राइलवर हल्ला करण्या
इस्रायल युद्ध


वाॅशिंग्टन, १ मार्च (हिं.स.) : हमास या दहशतवादी संघटनेकडून ऑक्टोबर २०२३ मध्ये इस्राइलवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याचा बदला म्हणून इस्राइलने मागील चार महिन्यांत सुमारे ३० हजार पॅलेस्टिनी महिला आणि मुलांची हत्या केली आहे.

इस्राइलचा खास मित्र असलेल्या अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली. लॉयड ऑस्टिन म्हणाले की, हमास या दहशतवादी संघटनेने ७ ऑक्टोबर रोजी इस्राइलवर हल्ला केला होता. त्याला प्रत्युत्तर अथवा बदला म्हणून इस्राइलने आतापर्यंत २५ हजारांहून अधिक पॅलेस्टिनी महिला आणि मुलांची हत्या केली आहे. ऑक्टोबरमध्ये हमासच्या हल्ल्यानंतर अमेरिकेने इस्राइलला जोरदार पाठिंबा दिला आहे. त्यावेळी झालेल्या हल्ल्यात सुमारे १,१६० लोक मारले गेले आहेत.

७ ऑक्टोबरपासून इस्राइलने गाझावर बॉम्बफेक केल्याने जवळपास संपूर्ण शहर जमीनदोस्त झाले आहे. पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, ३० हजारांहून अधिक लोक मरण पावले आहेत. दरम्यान, अमेरिका गाझामध्ये युद्धविराम आणि नागरी मृत्यू कमी करण्यासाठी दबाव आणत आहे. गाझामधील निष्पाप लोकांवरील इस्रायली सैन्याची क्रूरता कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याचा आरोप पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी गुरुवारी केला. लोक अन्न घेण्यासाठी रांगेत उभे होते. यादरम्यान इस्रायली सैन्याने त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात १०४ जणांचा मृत्यू झाला असून २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande