भरतनाट्यम नर्तक अमरनाथ घोष यांची अमेरिकेत हत्या
न्यूयॉर्क, 02 मार्च (हिं.स.) : सुप्रसिद्ध भरतनाट्यम नर्तक अमरनाथ घोष यांची अमेरिकेत गोळ्या घालून हत्
अमरनाथ घोष


न्यूयॉर्क, 02 मार्च (हिं.स.) : सुप्रसिद्ध भरतनाट्यम नर्तक अमरनाथ घोष यांची अमेरिकेत गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. ही घटना अमेरिकेतील मिसोरीमधील सेंट लुईस येथे घडली आहे. अज्ञात हल्लेखोरांना बेछूट गोळीबार करत अमरनाथ घोष यांना लक्ष्य केले. अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी यांनी अमरनाथ घोष यांच्या हत्येची माहिती दिली आहे. या हल्ल्याच्या घटनेनंतर आशियाई वंशाच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यासंदर्भात ट्विटरवरील (एक्स) एका पोस्टमध्ये देवोलिना भट्टाचार्जी हिने सांगितले की, अमरनाथ घोष याची मागच्या मंगळवारी हत्या करण्यात आली. हत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तसेच आरोपींची ओळखही पटलेली नाही. या घटनेनंतर न्याय मागण्यासाठी पीडिताची जवळची कुणी व्यक्ती तिथे उपस्थित नसल्याने कदाचित पोलिसही फार लक्ष देत नाही आहेत. आता भारत सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणाची दखल घेतली पाहिजे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा देवोलिना यांनी केलाय.

अमरनाथ घोष हे कोलकाता येथील रहिवासी होते. ते चेन्नईमध्ये आर्ट टीचर म्हणून काम पाहत होते. प्रसिद्ध भरतनाट्यमन डान्सरही होते. त्यांनी पीएचडीही केली होती. दरम्यान, देवोलिना भट्टाचार्जीने सांगितलं की, अमेरिकेतील त्यांचे काही मित्र अमरनाथ घोष यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करता यावेत म्हणून मृतदेहावर दावा करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र याबाबत अद्याप फारशी माहिती मिळालेली नाही. यादरम्यान शिकागोमधील भारताच्या महावाणिज्य दूतावासाने घोष यांचे नातेवाई आणि मित्र आपेष्टांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande