आमंत्रितांच्या टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत नाशिकचा बीडवर विजय
नाशिक, २८ मार्च (हिं.स.) : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय, वरिष्ठ महिला आमंत्रितांच्य
आमंत्रितांच्या टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत नाशिकचा बीडवर विजय


नाशिक, २८ मार्च (हिं.स.) : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय, वरिष्ठ महिला आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट ( इन्व्हिटेशन लीग ) स्पर्धेत , नाशिक जिल्हा संघाने बीडवर तर पूना क्लबने सांगलीवर मोठे विजय मिळवले. नाशिकतर्फे ईश्वरी सावकार व प्रियांका घोडकेने प्रभावी कामगिरी केली.

मेरी क्रिकेट क्लबच्या मैदानावर पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या बीड संघाला नाशिकच्या गोलंदाजांनी ७ बाद ६९ वर रोखले. कर्णधार प्रियांका घोडकेने ३ तर श्रुती गीते व पूजा वाघने प्रत्येकी १ बळी घेतला. विजयासाठीच्या ७० धावा ईश्वरी सावकार नाबाद ४० व शाल्मली क्षत्रिय नाबाद २१ यांच्या फलंदाजीच्या जोरावर तेराव्या षटकात पार करत नाशिक जिल्हा संघाने ९ गडी राखून मोठा विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात कर्णधार कविता नवगिरेच्या अष्टपैलु खेळाच्या जोरावर पूना क्लबने सांगली वर विजय मिळवला. सांगलीने प्रथम फलंदाजी करत ७ बाद १३२ धावा केल्या. सायली मोहितेने सर्वाधिक ४५ धावा केल्या. पूना क्लबच्या कविता नवगिरेने ३ बळी घेतले. त्यानंतर कविता नवगिरेच्या नाबाद ९८ धावांच्या जोरावर पूना क्लबने पंधरा षटकात ८ गडी राखून सांगलीवर मोठा विजय मिळवला.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande