बुधवारी रूबी ते रामवाडी मेट्रो मार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन
पुणे 4 मार्च (हिं.स.) रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या ६ किलोमीटर अंतराच्या मेट्रो मार्गाचे येत्या बु
 नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन


पुणे 4 मार्च (हिं.स.) रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या ६ किलोमीटर अंतराच्या मेट्रो मार्गाचे येत्या बुधवारी (दि.६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन होणार आहे. याचवेळी पिंपरी-चिंचवड ते निगडी या ४.४ किलोमीटर विस्तारित मेट्रो मार्गाचे भूमिपूजनही होणार आहे.

पंतप्रधान मोदी येत्या बुधवारी एका कार्यक्रमासाठी कोलकाता येथे असून, त्या कार्यक्रमामध्येच ते पुण्यातील एका मेट्रो मार्गाचे उद्घाटन व पिंपरी-चिंचवडमधील एका मेट्रो मार्गाचे भूमिपूजन करतील, असे पंतप्रधान कार्यालयाने मेट्रो प्रशासनाला कळविले आहे. दरम्यान, या कार्यक्रमांमध्ये ऐनवेळी बदल होण्याची शक्यता असल्याचेही पंतप्रधान कार्यालयाने सांगितले आहे.

रुबी ते रामवाडी या मेट्रो मार्गावरील बंडगार्डन, कल्याणीनगर व रामवाडी स्थानकांचे काम पूर्ण झाल्याने ती उद्घाटनानंतर प्रवाशांसाठी खुली होणार आहेत. येरवडा स्थानकाचे काम अद्याप सुरू असल्याने ते काही अवधीने सुरू होणार आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande