डोंबिवली : चोरट्यांना अटक
डोंबिवली, ०४ मार्च (हिं.स.) : कल्याण डोंबिवली व उल्हासनगर परिसरातील रिक्षा चोरून विकण्याच्या तयारीत
रिक्षा चोरणारे दोघे गजाआड, घरफोडीचा आरोपी अटक
( तीन सोनसाखळी चोरट्यांना ठोकल्या बेड्या )


डोंबिवली, ०४ मार्च (हिं.स.) : कल्याण डोंबिवली व उल्हासनगर परिसरातील रिक्षा चोरून विकण्याच्या तयारीत असलेल्या दोघा चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी गजाआड केले. या दोघांना डोंबिवलीतील टाटा नका येथून अटक केली. त्यांच्याकडून सात रिक्षा हस्तगत केल्या. तसेच घरफोडी करणाऱ्या एकास अटक केली असून तीन सोनसाखळी चोरट्यांना बेड्या ठोकल्या.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नासीर हुसेन पठान ( ३०, रा. न्यू गोविंदवाडी , कचोरेगाव , कल्याण पूर्व ) व शाहरुख बुडन शहा ( २८, रा,संभाजीनगर, जालना ) असे अटक केलेल्या रिक्षा चोरट्यांची नावे आहेत. मोटर वाहन चोरीच्या वाढत्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती काढत असताना सपोनि व पोलीस हवालदार राजेंद्र खिलारे यांनी माहिती मिळवून २८ फेब्रेवारी रोजी दोघांना अटक केली. या दोघांकडून ३ लाख ७० हजार रुपये किमतीच्या सात रिक्षा हस्तगत केल्या असून पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.

मानपाडा पोलीस ठाण्याचे वपोनि विजय कादबाने यांनी गुन्हेप्रकटीकरण पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे विशेष पथक बनवून सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजवरून व माहितीच्या आधारे घरफोडी गुन्ह्यातील आरोपी अफताफ ईशशाद मोमीन ( ३३, नफीस बिल्डींग, हसीन फरान टाकीजवळ, कसाईवाडा, भिवंडी ) येथून अटक केली.अफताफ हा त्याचा साथीदार तैसीफ अन्सारी यांच्याबरोबर केलेल्या चार घरफोडी गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी अटक आरोपीकडून १२ ग्रॅम वजनाचे ४८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे कॉईन, ५२ ग्रॅम वजनाचे चांदीचे कॉईन व रोख रक्कम आठ हजार रुपये आणि १ मोबाईल फोन असे एकूण ५९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात स्वप्नील हरीश माधवानी उर्फ करकट्या बाबू ( १८, रा. विजयदीप चाळ, जाकीर किराणा स्टोअर्सच्या बाजूला, शांतीनगर झोपडपट्टी, कळवा ), जावेद झाकीर शेख ( २३, एम.एम. चाळ, श्रीलंका मुंब्रा बायपास,मुंब्रा ) आणि इरफान सिद्दिक शेख ( २२, शांतीनगर झोपडपट्टी ,कळवा ) अशी तीन चोरट्यांची नावे आहेत. २० जानेवारी रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्व येथील ज्येष्ठ महिला आपल्या नातू सोबत उसाचा रस पिण्यासाठी उभे असताना या तिघांनी पाठीमागे येऊन त्यांच्या गळ्यातील १ लाख ८० हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याचे हार खेचून पसार झाले. या प्रकरणी ज्येष्ठ महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. पोलिसांनी अटक केलेल्या तिघा चोरट्यांकडून ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन तुकडे चैन, १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे अर्धवट तुटलेली चैन असा एकूण १ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्हातील आणखी एकाचा पोलीस शोध घेत आहेत.या आरोपींवर टिळकनगर, डोंबिवली, कळवा, चितळसर पोलीस ठाण्यात आठ गुन्हे दाखल आहेत.

डोंबिवली पूर्वकडील दावडी येथे १ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाली होती. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी भंगारचा धंदा करणारा राहुल नागेश घाडगे ( २५, संजय गांधीनगर झोपडपट्टी, प्रीतम टॅटो दुकानाच्या बाजूला. विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनजवळ, कल्याण पूर्व ) याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकून ५ ग्रॅम वजनाचे एकूण २ सोन्याचे मंगळसूत्र, ७ ग्रॅम वजनाचे एकूण २ सोन्याचे कानाचे झुमके, रिंग असे एकूण ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. राहुलवर कल्याण रेल्वे, कोळसेवाडी, बदलापूर पोलीस ठाण्यात एकूण ९ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande