सोलापूरात दोन मुलांसह आईची गळफास घेऊन आत्महत्या
सोलापूर , 4 मार्च (हिं.स.) मुळेगाव रोड येथील सरवदेनगरामध्ये एका मातेने आपल्या दोन लेकरांसह गळफास घे
सोलापूरात दोन मुलांसह आईची गळफास घेऊन आत्महत्या


सोलापूर , 4 मार्च (हिं.स.) मुळेगाव रोड येथील सरवदेनगरामध्ये एका मातेने आपल्या दोन लेकरांसह गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. स्नेहा संतोष चिल्लाळ (३०), संध्या संतोष चिल्लाळ (११), मनोजकुमार संतोष चिल्लाळ (७) अशी मयतांची नावे आहेत. शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून मयत घोषित केले. स्नेहा सरवदे यांनी टोकाचे पाऊल का उचलले, याबद्दल नेमके कारण मात्र अद्याप कळू शकलेले नाही.

मयत स्नेहा यांनी अगोदर दोन मुलांना गळफास दिला असावा, त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, शक्यता पोलिस सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande