सोलापूरात रेशन कार्ड न दिल्याने मुलाकडूनच आई-वडिलांचा खून
सोलापूर , 4 मार्च (हिं.स.) अतिशय किरकोळ कारणावरुन पोटच्या मुलानेच आई-वडिलांची हत्या केल्याचा धक्कादा
सोलापूरात रेशन कार्ड न दिल्याने मुलाकडूनच आई-वडिलांचा खून


सोलापूर , 4 मार्च (हिं.स.) अतिशय किरकोळ कारणावरुन पोटच्या मुलानेच आई-वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पाचेगाव बुद्रुक (ता. सांगोला) येथील दाम्पत्याच्या दुहेरी खून प्रकरणाचा पोलिसांनी अखेर छडा लावला.

रेशन कार्ड न दिल्याच्या कारणावरून कौटुंबिक वादातून पोटच्या मुलानेच आई- वडिलांचा गळा दाबून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलगा समाधान भीमराव कुंभार याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केल्याचे पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande