काँग्रेसमुळेच केजरीवाल जेलमध्ये - पी. विजयन
नवी दिल्ली, 01 एप्रिल (हिं.स.) : दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी आम आदमी पार्टीवर (आप) ओढावलेल्या संक
पिनराई विजयन


नवी दिल्ली, 01 एप्रिल (हिं.स.) : दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी आम आदमी पार्टीवर (आप) ओढावलेल्या संकटाला काँग्रेसच जबाबदार आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीमुळेच अरविंद केजरीवाल जेलमध्ये गेल्याचे सांगत केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले.

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनिषेधार्थ विरोधकांच्या आयएनडीआयए आघाडीने रविवारी दिल्लीच्या रामलीला मैदानात लोकशाही बचाओ महारॅलीचं आयोजन केले होते. या रॅलीच्या दुसऱ्याच दिवशी आघाडीतील घटक पक्षाने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. याबाबत पी. विजयन म्हणाले की, काँग्रेसकडूनअरविंद केजरीवालांवर आरोप करण्यात आला. त्यानंतर काँग्रेसनेच दिलेल्या तक्रारीनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जेलमध्ये गेले असा आरोप त्यांनी केला. विशेष म्हणजे दिल्लीच्या महारॅलीत सीपीआय (एम) चे महासचिव सीताराम येचुरीही सहभागी झाले होते. केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी पुन्हा लोकसभेची निवडणूक लढत आहेत. या मतदारसंघात आयएनडीआयए आघाडीतील घटक पक्ष असलेल्या सीपीआयचा उमेदवार मैदानात आहे. राहुल गांधी काँग्रेसचे मोठे नेते आहेत हे आम्हाला ठाऊक आहे. पण वायनाडमध्ये ते कोणाविरोधात लढाई लढतायेत हे पाहा. त्याठिकाणी सीपीआयचे एनी राजाविरोधात राहुल गांधी उभे आहेत. काँग्रेस आणि सीपीआय इंडिया आघाडीचा भाग आहे. मात्र ते भाजपाशी लढण्याऐवजी सीपीआयच्या उमेदवाराला आव्हान देत असल्याचे विजयन म्हणाले. दिल्लीत झालेल्या विरोधकांच्या सभेनंतर डाव्या पक्षांनी काँग्रेस संदर्भात घेतलेली भूमिका पक्षाला अडचणीत आणणारी असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलेय.

केरळच्या वायनाड मतदारसंघात प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांना मैदानात उतरवून भाजपाने खेळी खेळली आहे. यापूर्वी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि बीडीजेएसने एकत्रित निवडणूक लढली होती. त्यावेळी तुषार वेल्लापल्ली त्यांचे उमेदवार तिसऱ्या स्थानावर होते. त्यांना जवळपास 78 हजार मते मिळाली होती जी 7.25 टक्के होती. तर राहुल गांधींना 4 लाख 31 हजाराहून अधिक मतदान झाले होते. मोठ्या मताधिक्यांनी त्यांनी ही जागा जिंकली होती.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande