नाशिक - 125 जणांची फसवणूक, दोघांविरोधात गुन्हा दाखल
नाशिक, २ एप्रिल, (हिं.स) - बेकायदा सावकारी करत 125 जणांची फसवणूक केल्याची घटना समोर आली. याबाबत दो
नाशिक - 125 जणांची फसवणूक, दोघांविरोधात गुन्हा दाखल


नाशिक, २ एप्रिल, (हिं.स) - बेकायदा सावकारी करत 125 जणांची फसवणूक केल्याची घटना समोर आली. याबाबत दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सहकारी संस्थेचे लेखापरिक्षक रविंद्र बाबजी गुंजाळ जय ओकारनगर, पेठरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रामदास दशरथ मोगल यांनी सहाय्यक सहकार निबंधक निफाड यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यात म्हटले की, ज्ञानेश्वर काकड (वय ३८, रा. मानकर मळा, मखमलाबाद) व पोपट वसंत काकड (वय ४१, रा. शांतीनगर, मखमलाबाद) हे दोघे बेकायदेशीररित्या सावकारीचा व्यवसाय करतात. अशी माहिती दिली. त्यानुसार लेखा परिक्षक सहकारी संस्था येवला यांच्या पथकाने प्रविण काकड व पोपट काकड यांच्या राहत्या घरी झाडाझडती घेतली असता. त्यात ४६ करारनामे, ४४ कोरे स्टॅम्प पेपर, इतर नावे असलेले ५ स्टॅम्प पेपर, १०७ धनादेश, व्याज व लोकांना दिलेल्या कर्जाच्या नोंदी असलेल्या तीन डायऱ्या या छाप्यादरम्यान आढळून आल्या. त्यानंतर या पथकाने प्रवीण काकड व पोपट काकड यांची अधिक चौकशी करूनअवैध सावकारीतून दोघांनी गरजवंतांना लुबाडले त्यांनी सुमारे १२५ ते १५० नागरिकांना कर्ज देऊन व मोठ्या रकमा देऊन दरमहा ५ टक्के प्रमाणे त्यांच्याकडून व्याज वसूल केले. तसेच काही जणांच्या अज्ञातपणाचा फायदा घेऊन त्यांच्या मालमत्ता कवडीमोल दराने बळजबरीने हडप करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली. त्याचप्रमाणे या दोन्ही आरोपींनी सावकारी करण्याचा अधिकृत परवाना नसताना गैरकायदेशीरपणे सावकारी करून गरजु व्यक्तींकडून अवाच्या सव्वा व्याज आकारून त्यांची फसवणूक केल्याची बाब या छाप्यामध्ये लक्षात आली.

हा प्रकार सन २००८ ते १ एप्रिल २०२४ या कालावधीत दोंदे मळा व मानकर मळा येथे घडला. याप्रकरणी रविंद्र गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार म्हसरूळ पोलीस ठाण्यात प्रवीण काकड व पोपट काकड यांच्याविरुद्ध अवैध सावकारी व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ठाकूर करीत आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande