नाशिक - अपघातात सात वर्षीय बालकाचा मृत्यू
नाशिक, २ एप्रिल, (हिं.स) : दुचाकीवरून जात असताना पुढे असलेल्या चारचाकीच्या दाराला जोरदार धडक न दिल्य
नाशिक - अपघातात सात वर्षीय बालकाचा मृत्यू


नाशिक, २ एप्रिल, (हिं.स) : दुचाकीवरून जात असताना पुढे असलेल्या चारचाकीच्या दाराला जोरदार धडक न दिल्याने दुचाकीवर पुढे बसलेल्या सात वर्षीय बालकाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना पाथर्डी फाटा ते पाथर्डी रोड दरम्यान घडली. तत्सम राहुल पानपाटील (वय ७, रा. र मोंढेनगर, उत्तमनगर, सिडको) असे अपघातात मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राहुल पानपाटील न हे आपल्या मित्राच्या मोटारसायकलवर तत्सम सोबत पाथर्डी फाटा येथून पाथर्डी गावाकडे जात होते. पुजा टेक्सटाईलजवळ आले असता त्यांची दुचाकी एम.एच.१५ डी.एम. १२३० या क्रमांकाच्या आय१० गाडीच्या डाव्या दरवाजावर जाऊन आदळली. या अपघातात तत्समच्या डोक्याला जबर मार लागला. त्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. औषधोपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. अपघातस्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ इंदिरानगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande