अमरावती : प्रचारासाठी उमेदवारांचा भर सोशल मिडीयावर
अमरावती, 2 एप्रिल (हिं.स.) :अन्न, वस्त्र व निवारा नंतर आता मोबाइल सुद्धा माणसाची मूलभूत गरज बनला आह
अमरावती : प्रचारासाठी उमेदवारांचा भर सोशल मिडीयावर


अमरावती, 2 एप्रिल (हिं.स.) :अन्न, वस्त्र व निवारा नंतर आता मोबाइल सुद्धा माणसाची मूलभूत गरज बनला आहे. शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांच्या हाती स्मार्टफोन आले आहेत. त्यामध्ये फेसबुक, व्हॉट्सअॅप, मॅसेंजर, द्विटर, इन्स्टाग्राम यांसारखे सोशल मीडियाचे ऍप्स उपलब्ध आहेत. यामुळेच बॅनर, बिल्ले, पोस्टर्स यासारख्या वस्तूंवर खर्च करण्यापेक्षा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करण्याकडे राजकीय पक्षांचा कल दिसून येत आहे. यामुळे आता निवडणुकीला अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक असतानाही अजूनपर्यंत प्रिंटिंग व्यवसायात फारशी तेजी बघायला मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

सोशल मीडियामध्ये व्हॉट्स ऍप हे सर्वाधिक प्रचलित असलेले ऍप आहे. आपला पक्ष व उमेदवार याला फायदेशीर ठरू शकतील, असे मॅसेज तयार करणारी यंत्रणा बहुतांश प्रमुख पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी तयार करून ठेवली आहे. काही मॅसेजपक्षातर्फे वरिष्ठ स्तरावरून पाठविले जातात. ते मॅसेज जसेच्या तसे इतर ग्रुपवर पाठविण्याचे काम ही यंत्रणा करीत असल्याचे दिसून येते. सन २०१४च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सोशल मीडिया आजच्या एवढा शक्य नव्हता. काही नागरिकांच्या हातामध्ये साधा मोबाइल आला होता. त्यामुळे साधा टेक्स्ट मॅसेज करावा लागत होता. त्यातही प्रत्येक मॅसेजला एक ते दीड रुपया मोजावा लागत असल्याने असे मॅसेज करणे आर्थिक दृष्ट्या परवडणारे नव्हते. मात्र सद्यःस्थितीत अनेकांच्या हातात स्मार्ट फोन आला आहे. इंटरनेटचा डेटाही स्वस्त आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा खर्च अतिशय कमी असल्याने उमेदवार सोशल मीडियावर भर देत आहे.

प्रिंटिंग व्यावसायिकांच्या व्यवसायावर परिणाम

राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चित केले आहेत. त्यामुळे निवडणूक प्रचाराचे साहित्य तयार करण्याची मागणी वाढायला पाहिजे होती. मात्र अजूनही ग्राफिक्स, प्रिटिंग प्रेसमध्ये उमेदवारांकडून मागणी आली नसल्याची माहिती काही व्यावसायिकांनी दिली. त्यामुळे व्यवसाय कमी राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande