राष्ट्रीय महत्त्वाच्या घटनांकडे मोदींचे दुर्लक्ष – शरद पवार
नागपूर, 02 एप्रिल (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी जुने विषय उकरून काढत दिवंगत नेत्यांवर आरोप करता
शरद पवार


नागपूर, 02 एप्रिल (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी जुने विषय उकरून काढत दिवंगत नेत्यांवर आरोप करतात. परंतु, राष्ट्रीय महत्त्वाचे मुद्दे आणि विषय याकडे त्यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (तुतारी गट) अध्यक्ष शरद पवार यांनी केला. ते नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख देखील पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

चीनने अरुणाचल प्रदेशातील 30 गावांची नावे बदलण्याची उठाठेव केलीय. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने पवार म्हणाले की, इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान असताना 1974 मध्ये भारत आणि श्रीलंकेदरम्यान असलेले काचाथीवू बेट त्यांनी श्रीलंकेला देऊन टाकले होते. तामिळनाडूचे भाजप प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांनी आरटीआए अंतर्ग माहिती घेत या विषयाला वाचा फोडली. त्यानंतर उत्तरप्रदेशातील एका जनसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंदिया गांधींच्या काळात झालेल्या या घटनेवर आरोप केलेत. हा संदर्भा चीनच्या कृत्याशी जोडत पवार म्हणाले की, पंतप्रधान एकीकडे हयात नसलेल्या इंदिरा गांधींवर टीका करतात. परंतु, चीनकडून आमच्या बळकावलेल्या प्रदेशाबद्दल काहीच बोलत नाहीत. छोट्या-मोठ्या गोष्टींवर फोकस करताना राष्ट्रीय महत्त्वाच्या घटनांकडे पंतप्रधान गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप पवार यांनी यावेळी केला.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande