वणवा रोखण्यासाठी स्टार वेशन पध्दतीचा अवलंब
अमरावती, 2 एप्रिल (हिं.स.) : शुक्रवारी सायंकाळी ६चे सुमारास डेन्टल कॉलेज परिसरातील सागवान झाडांच्या
वणवा रोखण्यासाठी स्टार वेशन पध्दतीचा अवलंब


अमरावती, 2 एप्रिल (हिं.स.) : शुक्रवारी सायंकाळी ६चे सुमारास डेन्टल कॉलेज परिसरातील सागवान झाडांच्या वनात पेटलेला वणवा अग्निशमन पथकाने पाण्याविना विझवण्याची मोहीम फत्ते केली. यामुळे लाखो रुपयांची वन संपदा जळून खाक होण्यापासून वाचली. वनात लागलेली ही आग पसरण्यापासून रोखण्यासाठी पाण्यावाचून आग रोखण्याच्या स्टार वेशन पध्दतीचा अवलंब करण्यात आला. आकस्मिक वेळी पाणी उपलब्ध न झाल्यास आग पसरण्यापासून रोखण्यासाठी हे तंत्रही कामी येते.

शहरातील वडाळी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या डेन्टल कॉलेज परिसरातील सागवान वनाला आगीने वेधले असल्याची माहिती मिळताच वाहन चालक राजेश लढे, फायरमॅन विशाल भगत, फायरमॅन मनीष तंबोले, फायरमॅन बुंदेले यांची टीम काही मिनिटातच घटनास्थळी धडकली आणि तात्काळ हि आग विझवण्याची प्रकिया सुरु झाली. यावेळी आगीचा वणवा पसरण्यापासून रोखण्यासाठी आग लागलेल्या परिसरातील पाला-पाचोळा सावरून वणव्याचा वेग रोखन्यात आला. काही मिनिटातच हि कारवाई फत्ते करून लाखमोलाची वन संपदा खाक होण्यापासून वाचवली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande