मराठा सर्वेक्षणाचे मानधन मिळावे- प्राथमिक शिक्षक समिती
,अमरावती 2 एप्रिल (हिं.स.) : जिल्हयातील कर्मचाऱ्यांच्या वतीने २३ ते ३१ जानेवारी २०२४ दरम्यान मराठा स
मराठा सर्वेक्षणाचे मानधन मिळावे- प्राथमिक शिक्षक समिती


,अमरावती 2 एप्रिल (हिं.स.) : जिल्हयातील कर्मचाऱ्यांच्या वतीने २३ ते ३१ जानेवारी २०२४ दरम्यान मराठा समाज आरक्षण सर्वे संदर्भात सर्वेक्षण करण्यात आले. सबंधीत सर्वेक्षणाचे दोन महिने संपत आले असुन तरीही कर्मचाऱ्यांना कोणतेही मानधन देण्यात आले नाही.तरी शिक्षक,कर्मचारी यांना मानधन मिळण्यात यावे अश्या मागणीचे निवेदन प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस संभाजी रेवाळे,राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी १एप्रिला जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना दिले आहे.याबाबत चौकशी करुन मानधन वाटप करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले. शासनाने युध्द पातळीवर मराठा समाजाला आरक्षण लागु करण्या करीता गावा-गावात प्रत्येक कुटूबांचे सव्हेक्षण करण्याचे आदेश दिले होते.त्या आदेशा नुसार अमरावती जिल्हातील शेकडो शिक्षक,कर्मचारी यांनी मराठा समाजाचे आरक्षण सर्वेक्षण केले अश्या प्रगणक व पर्यवेक्षक यांना तातडीने मानधन अदा करण्यात यावे.अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने आपल्या निवेदनातुन केली आहे.

तसेच शिक्षकांचा वेळ अशैक्षणीक कार्यात जावु नये, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवु नये यासाठी जिल्हा परिषद, म.न.पा., न.प. मधील शिक्षकांना अशा उपक्रमांची जबाबदारी देण्यात येवु नये,अशी विनंती सुध्दा निवेदनातुन केली आहे असे शिक्षक समितीचे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख शैलेन्द्र दहातोंडे यांनी कळविले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande